JOIN US
मराठी बातम्या / पुणे / फेसबुकवर महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून करायचा असा गोरखधंदा, नंतर झाली फजिती

फेसबुकवर महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून करायचा असा गोरखधंदा, नंतर झाली फजिती

फेसबुक बनावट अकाऊंट उघडून महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठऊन प्रोफाईल फोटो मॉर्फ करून अश्लिल फोटो तयार करणाऱ्या भामट्याचा नांग्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बारामती, 8 जुलै: फेसबुक बनावट अकाऊंट उघडून महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठऊन प्रोफाईल फोटो मॉर्फ करून अश्लिल फोटो तयार करणाऱ्या भामट्याचा नांग्या पोलिसांनी आवळल्या आहेत. बारामती पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि 353 (c),आयटी अॅक्ट 67,67a प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा…  कोरोनाच्या भीतीनं 78 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या,मृत्यूनंतर रिपोर्ट आला निगेटिव्ह काय आहे प्रकरण? संदीप सुखदेव हजारे (वय-29, वर्षे, रा. आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा) असं आरोपीचं नाव आहे. बारामती पोलिसांनी आरोपीला दहिवडी येथून अटक केली आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपी संदीप हजारे हा गणेश खरात या बनावट नावानं फेसबुक अकाऊंट चालवत होता. याच अकाऊंटवरून तो शेकडो महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होता. महिलांनी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर महिलांचे प्रोफाईल फोटो क्रॉप करून त्यांचा चेहरा वापरून महिलांचे अशील फोटो तयार करत होता. नंतर संबंधित महिलांना चॅट करून ‘माझ्याशी बोल. मैत्री कर. नाहीतर तुझे अश्लिल फोटो व्हायरल करेल.’, अशी धमकी देत होता. बारामती तालुका पोलिस स्टेशनमध्ये याबाबत काही महिलांनी तक्रार दिली होती. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि योगेश लंगुटे, पोलिस नाईक परिमल मानेर, पोलिस कॉन्स्टेबल नंदू जाधव, पोलिस कॉन्स्टेबल मंगेश कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे यांनी तांत्रिक टीमच्या मदतीनं आरोपी संदीप सुखदेव हजारे याला दहिवडी येथे रंगेहात अटक केली. हेही वाचा… पत्नीची हत्या करून पती फिरत होता दुचाकीवर, पोलिसांनी पकडल्यावर धक्कादायक खुलासा आरोपीविरुद्ध पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशन, अहमदनगर जिल्हातील घारगाव पोलिस स्टेशन, कराड पोलिस स्टेशन, संगमनेर पोलिस स्टेशन, रत्नागिरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे. आरोपीने महाराष्ट्रात अनेक महिलांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. याबाबत कुणाची तक्रार असल्यास बारामती तालुका पोलिस स्टेशनला (दूरध्वनि क्र. 02112- 223433) संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या