Home /News /crime /

पत्नीची हत्या करून पती फिरत होता दुचाकीवर, पोलिसांनी पकडल्यावर सांगितला जीवघेणा प्लॅन!

पत्नीची हत्या करून पती फिरत होता दुचाकीवर, पोलिसांनी पकडल्यावर सांगितला जीवघेणा प्लॅन!

गुन्ह्यातील आरोपी हा रांजणगाव येथे पिवळ्या रंगाच्या प्लेजर दुचाकीवरुन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

  आनिस शेख, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, 08 जुलै : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करुन फरार असणाऱ्या आरोपी पतीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 5 पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे स्वतः आत्महत्येच्या तयारीत असणाऱ्या आरोपीला आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांनी पकडण्यात यश आले आहे. करीम शेख असं आरोपीचे नाव आहे. त्याने  दोन दिवसांपूर्वी आबेदा शेख हिचा साई नगर देहू रोड इथं  कामाला जात असताना सकाळी आठच्या सुमारास धारदार हत्याराने खून केला होता. पत्नीची हत्या करून करीम शेख  फरार झाला होता. मद्यधुंद तरुणाकडून JCB ड्रायव्हरला शिवीगाळ, संतापलेला चालकानं असा शिकवला धडा या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर करीमचा शोध सुरू होता. गुन्हे शाखा युनिट 5 पथकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना सदर गुन्ह्यातील आरोपी हा रांजणगाव येथे पिवळ्या रंगाच्या प्लेजर दुचाकीवरुन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून आरोपी करीम याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून नायलॉन दोरी तसंच एक सुसाईड नोट आढळून आली आहे. पत्नीच्या असलेल्या अनैतिक संबंधातून तिचा खून केला असल्याचे तसंच तिच्या खुनानंतर आपण स्वतः आत्महत्या करणार असल्याचे सुसाईड नोटमध्ये आरोपी याने लिहिले होते. हवेतून पसरणाऱ्या कोरोनाला घाबरायची गरज नाही, शास्त्रज्ञांनी आणला खास 'फिल्टर' परंतु,  आत्महत्या करण्याआधीच पोलिसांनी आरोपी   करीम याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्यावर पत्नीच्या खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: पिंपरी-चिंचवड

  पुढील बातम्या