कोरोनाच्या भीतीनं 78 वर्षीय व्यक्तीनं केली आत्महत्या, मृत्यूनंतर रिपोर्ट आला निगेटिव्ह

कोरोनाच्या भीतीनं 78 वर्षीय व्यक्तीनं केली आत्महत्या, मृत्यूनंतर रिपोर्ट आला निगेटिव्ह

कोरोनाची भीती अनेकांच्या मनात बसली आहे. अनेकदा आपली हिंमत या भीतीपुढे गळून पडते.

  • Share this:

जयपूर, 8 जुलै : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनाची भीती अनेकांच्या मनात बसली आहे. अनेकदा आपली हिंमत या भीतीपुढे गळून पडते. असंच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाचा रिपोर्ट येण्याआधीच भीतीनं 78 वर्षीय वृद्धानं आपलं जीवन संपवलं आहे. राजस्थानमधील जयपूर इथे रुग्णालयात दाखल कऱण्यात आलेल्या 78 वर्षीय व्यक्तीची प्रकृती खालावत असल्यानं कोरोना चाचणी करण्यात आली.

कोरोनाची चाचणी झाल्यानंतर अस्वस्थ असलेल्या या व्यक्तीनं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शंकरलाल नावाचा व्यक्ती फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं जयपूरमधील हेल्थ सायन्स रुग्णालयात भर्ती झाले होते.

हे वाचा-क्वारंटाइन सेंटरमधून रुग्णांना घरी सोडण्याचं काम करतोय 'हा' कोरोना योद्धा

कोरोनाची चाचणी झाल्यानंतर त्यांना भीतीपोटी अस्वस्थ वाटू लागलं. त्यांनी रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल या भीतीनं खिडकीची जाळी तोडून आत्महत्या केली. या घटनेनंतर काही मिनिटांत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती रुग्णालयानं दिली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले.

देशात गेल्या 24 तासात 22 हजार 752 नवीन प्रकरणं नोंदवली गेली तर, 482 लोकांचा मृत्यू झाला. याहस भारतातील कोरोना कोरोनाबाधितांचा आकडा हा 7 लाख 42 हजार 417 झाली आहे. तर, आतापर्यंत 4 लाख 56 हजार 831 रुग्ण निरोगी झाले आहे. आतापर्यंत 20 हजार 20 हजार 642 जणांचा मृत्यू झाला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 8, 2020, 3:48 PM IST

ताज्या बातम्या