JOIN US
मराठी बातम्या / पुणे / सुशांतसिंह प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

सुशांतसिंह प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

मग सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांवर कुणाचा दबाव होता?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 28 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजपच्या कोणत्याही नेत्याने प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाही आहे. असं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, गेली 40 दिवस जे खुलासे झाले नाहीत ते सीबीयच्या तपासात समोर येत आहेत. मग सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांवर कुणाचा दबाव होता? याचा तपास व्हायला हवा. हार्ड डिस्क नष्ट कुणी केल्या हे देखील समोर यायला हवं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. हेही वाचा… प्रेम प्रकरण उघड होण्याच्या भीतीने मित्रानच काढला जिवाभावाच्या मित्राचा काटा! देवेंद्र फडणवीस आज पुण्यात आहेत. बाणेर येथील कोविड सेंटरच्या उद्घाटनानंतर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याची विशेषत: मुंबईची कोरोनाबाबत स्थिती समाधानकारक नाही. मात्र, पुणे जिल्ह्यात चाचण्या संख्या जास्त आहेत. मुंबईत चाचण्या वाढल्या पाहिजेत. देशातील 40 टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. राज्यातील कोरोनाबाधित आणि मृत्यूचा असे दोन्ही दर कमी व्हायला पाहिजेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत… अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द न करता त्या घ्याव्याच लागतील. मात्र त्यासंदर्भात तारखा ठरवण्याचे निर्देश प्रत्येक राज्यांना असतील. UGC ने दिलेल्या तारखांना परीक्षा घेता येणार नसतील तर नवीन तारखा UGC सोबत चर्चा करून ठरवण्यात याव्या आणि जाहीर कराव्यात, असा निर्णय शुक्रवारी सुप्रीम कोर्टानं दिला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान टळणार आहे. ‘आवाज’ म्हटल्यावर ‘माझा आवाज कुणी दाबू शकत नाही’, असा टोलाही फडणवीस यांनी गंमतीत लगावला. सचिन सावंतांचा अभ्यास कमी पडतोय… देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांच्यावरही यावेळी निशाणा साधला. संदीप सिंह हे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो सिनेमा झाला त्याचेही निर्माते आहेत. एखाद्या कार्यक्रमात माझा त्यांच्यासोबत फोटो असेल, त्यावर राजकारण करण्यासारखं काहीही नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. हेही वाचा… SSR Case : अंकिता लोखंडेची पोस्ट शेअर करत कंगनाने साधला रियावर निशाणा सचिन सावंत यांच्या अभ्यास कमी पडत आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी सावंतांना टोला लगावला. सावंत यांना विधान पारिषदेवर जायचं आहे. त्यांना संधी मिळत नाही म्हणून ते सध्या निराश आहेत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या