पालघर, 28 ऑगस्ट: बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडल्यानं बोईसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरण उघड होण्याच्या भीतीनं मित्रानच मित्राचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील एक आरोपी मृत बेपत्ता मित्रांला शोधण्यासाठी त्याच्या कुटुंबासोबत फिरून बनाव करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
हेही वाचा.. 2 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या, संतप्त गावकरी उतरले रस्त्यावर
बोईसर परिसरातील अवधनगर रोशन गॅरेज गल्ली येथे राहणारा शिवरत्न राय (उर्फ शिवम) हा शनिवारी 22 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता घरात जेवण झाल्यानंतर बसला होता. त्याला त्यांचा मित्र अबुझर लयीयास सिद्धीकी यानं व्हॉट्सअॅप कॉल करून बाहेर बोलवलं. घरात काहीही न सांगता बेपत्ता झालेल्या शिवम राय याचा मृतदेह बुधवार 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या गंगोत्री हॉटेल समोरील झुडपांमध्ये आढळून आला होता.
अधिक माहिती अशी की, मृत शिवम राय याला व्हॉट्सअॅप कॉल करून आरोपी अबुझर सिद्धीकी वय (19) यानं बाहेर बोलवून घेतलं. त्यानंतर गंगोत्री हॉटेलसमोर असलेल्या मैदानात निर्जंन स्थळी असलेल्या जागेवर नेऊन त्याला बेदम मारहाण करून त्यांचा गळा आवळून ठार मारले. अबुझर सिद्धीकी व आरिफ खान यानं शिवमचा मृतदेह बाजूला असलेल्या झुडपात फेकला होता.
मित्रांची हत्या केल्यानंतर शेवटचा कॉल आलेल्या अबुझर लयीयास सिद्धीकी याची पोलिसांनी देखील चौकशी केली होती. यातच हा आरोपी स्वतःहून खुन केलेल्या मित्रांचा शोध घेण्याचा बहाणा करून मृत मित्रांच्या कुटुंबासोबत देखील बेपत्ता मित्रांचा शोध घेण्याचा बनाव केल्याची नाट्यमय घटना उघड झाली आहे.
हेही वाचा...वडिलांनीच संपवला लेकाचा 5 वर्षांचा संसार, सुनेला कुऱ्हाडीने वार करून केलं ठार
बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई वैभव जामदार, अशपाक जमादार, देवा पाटील, वाघचौरे, हवालदार मर्दे यांनी गुन्हाचा संपूर्ण उलघडा केला. आरोपी अबुझर लयीयास सिद्धीकी व आरिफ खान याला ताब्यात घेण्यात आलं आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.