मुंबई, 28 ऑगस्ट : रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) ने नुकतेच सुशांत सिंह राजपूत प्रकरणी (Sushant Singh Rajput Case) मौन सोडले आहे. यावेळी तिने काही धक्कादायक वक्तव्यं केले आहेत. मुलाखतीमध्ये तिने तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत चर्चा केली आहे. रियाने सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेवरही (Ankita Lokhande) निशाणा साधला, ज्याचे उत्तर लगेचच अंकिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले आहे. सुशांत प्रकरणात चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना रणौतने देखील अंकिताचे हे उत्तर रिट्वीट केले आहे आणि रिया चक्रवर्तीवर आणि बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. रिया चक्रवर्तीच्या मुलाखतीनंतर कंगनाने काही ट्वीट्स केले आहेत. यानंतर रियाने सुशांतच्या मानसिक स्थितीबाबत केलेल्या वक्तव्याबाबत अंकिताच्या प्रतिक्रियेच्या आधाराने तिने रियावर टीका केली आहे. (हे वाचा- SSR Death : CBI चौकशीकरता रिया चक्रवर्ती DRDO गेस्टहाऊसमध्ये पोहोचली) तिने ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘सत्य, सुशांतचा रियाला डेट करण्याआधी कोणत्याही मानसिक आजाराचा इतिहास नव्हता, हा मानसिक आजाराचा कट युरोट ट्रीपदरम्यान एका गॉथ हॉटेलमध्ये रचला गेला, ज्याला एअर सिकनेससह ट्विस्ट करण्यात आले, याचा लंगडा स्क्रीप्ट रायटर कोण आहे?’
Only 2 things to take away from #RheaChakrobarty interview,first she said Movie mafia discredited and harassed him also planted organised smear campaigns which broke his mind,2nd she did not say that after that vultures like her and Mahesh Bhatt killed him again #ShameOnAajTak
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 27, 2020
कंगनाने आणखी एक ट्वीट करून म्हटले आहे की, ‘रिया चक्रवर्तीच्या मुलाखतीनंतर 2 गोष्टी समोर आल्या, एक म्हणजे तिने म्हटले की मुव्ही माफियाने सुशांतचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी त्याला त्रास दिला आणि नियोजनबद्ध पद्धतीने त्याच्या विरोधात कॅम्पेन केले. दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर महेश भट्ट आणि तिच्यासारख्या गिधाडांनी त्याला पुन्हा मारले’.