JOIN US
मराठी बातम्या / पुणे / चिंताजनक! पुणे शहरालगतच्या 23 गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग, प्रशासनानं घेतला मोठा निर्णय

चिंताजनक! पुणे शहरालगतच्या 23 गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग, प्रशासनानं घेतला मोठा निर्णय

पुणे शहरात तर कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. पण मनपा हद्दीलगतची 23 गावं देखील कोरोनाबाधीत बनली आहेत.

जाहिरात

आता मोठ्या सोसायट्यांमध्ये रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. तर अनेक नवे पॉकेट्स तयार होत असल्याने प्रशासनाचं सर्व लक्ष त्यावर केंद्रीत झालं आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 15 जुलै: पुणे शहरालगतच्या 23 गावांमध्येही कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी तिथं आता प्रत्येक 50 कुटुंबांमागं एक सेक्टरप्रमुख नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेक्टर प्रमुखाच्या माध्यमातूनच तिथल्या कोरोना साथीचं निर्मुलन केलं जाणार आहे. हेही वाचा…. महापालिका आयुक्तांना अश्लिल शिवीगाळ, मनसेच्या उपजिल्हाध्यक्षाला अटक पुण्यालगतची 23 गावांमध्येही कोरोनाचा उद्रेक -शहरालगतच्या हवेली तालुक्यात अँक्टिव्ह रूग्णांची संख्या 850 च्यावर -पुणे ग्रामीण भागातील रूग्णसंख्या 4 हजारांवर, तर 100 दगावले पुणे शहरात तर कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. पण मनपा हद्दीलगतची 23 गावं देखील कोरोनाबाधीत बनली आहेत. कारण या गावांमधील बहुतांश लोक हे नोकरी धंद्यानिमित्त पुणे शहरात येजा करतात. म्हणूनच 23 गावांमधील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी या गावांमध्ये लॉकडाऊन काळात सगळीकडे फवारणी केली जात आहे. तसंच घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण केलं जात आहे. तसंच या शहरालगतच्या गावांमधून झेडपी सीईओ आयुष प्रसाद यांनी प्रत्येक 50 कुटुंबांमागे एक सेक्टर प्रमुख नियुक्त करण्याचे निर्देश दिलेत, अशी माहिती पुणे झेडपीचे सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली आहे. दरम्यान, नऱ्हेसारख्या गावांमध्ये एकाचवेळी प्रांत आणि पुणे पोलिस अशा दोन्ही यंत्रणांकडून भिन्न स्वरूपाचे आदेश पारित केले गेल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. तसंच सततच्या सीलबंद लॉकडाऊनला नोकरदारही वैतागले आहेत. हेही वाचा… हीच आमची जमेची बाजू,सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मराठा समाजाची पहिली प्रतिक्रिया पुणे शहरालगतच्या या 23 गावांमध्ये यापूर्वीच सीलबंदचे आदेश जारी झाले आहे. तरीही कोरोनाचा फैलाव काही केल्या थांबत नाही आहे. झेडपी सीईओंची ही सेक्टर प्रमुखाची संकल्पना तरी वर्कआऊट होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या