Home /News /mumbai /

महापालिका आयुक्तांना अश्लिल शिवीगाळ, मनसेच्या उपजिल्हाध्यक्षाला अटक

महापालिका आयुक्तांना अश्लिल शिवीगाळ, मनसेच्या उपजिल्हाध्यक्षाला अटक

वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तांना अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) उपजिल्हाध्यक्षाला पोलिसांनी अटक केली आहे.

वसई, 15 जुलै: वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तांना अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) उपजिल्हाध्यक्षाला पोलिसांनी अटक केली आहे. वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरन डी यांना अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात मनसेच्या पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या प्रवीण राऊत, जयेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख वितेंद्र पाटील यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, विरार पोलिसांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पुढील तपास विरार पोलीस करीत आहेत. हेही वाचा...Maratha Reservation : हीच आमची जमेची बाजू, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर मराठा समाजाची पहिली प्रतिक्रिया मनसेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, प्रवीण राऊत,जयेंद्र पाटील यांनी आयुक्तांच्या दालनाच्या दरवाज्यावर पोस्टर चिकटवले होते. तसेच आयुक्तांना खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली होती. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. याप्रकरणी आयुक्तांनी विरार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल केली होते. या प्रकरणी वितेंद्र पाटील यांना अटक केली आहे. आता पोलिस अविनाश जाधव यांना अटक करतात का? हे आता पाहावे लागणार आहे. मात्र विरार पोलिसांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, लातूर जिल्ह्यात खरीपातील सोयाबीनचं बियाणं वांझोटं निघाल्याच्या तब्बल सहा हजार तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. सोयाबीनचं बियाणं उगलंच नसल्याने हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कृषी संचालक कार्यालयात तुफान राडा करत तोडफोड केली. बोगस बियाणे कंपनीवर गुन्हे दाखल व्हावे व शेतकरी बांधवांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणीही केली. एवढ्या तक्रारी प्राप्त होऊनही लातूरच्या कृषी विभागानं मात्र काही बियाण्यांच्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून आपलं काम उरकलं. त्यामुळे अजूनही हजारो शेतकऱ्यांच्या पेरणीचा प्रश्न कायम आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणींबाबत शेतकरी संघटना आणि मनसेच्या वतीनं देखील आंदोलने करण्यात आली. मात्र, तरीही कृषी विभागाच्या कागदात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही. याचाच उद्रेक म्हणून मनसे कार्यकर्त्यांकडून मंगळवारी चक्क लातूरच्या कृषी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. हेही वाचा...मेळघाटातील आदिवासींनी करून दाखलवं, 'हे' गाव 4 वर्षांपूर्वीच झालं 'आत्मनिर्भर' बोगस बियाण्यांच्या विविध कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च कंपन्यांकडून वसूल करण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी कृषी कार्यालयात मनसेनं राडा केला.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: MNS, Vasai crime, Vasai police

पुढील बातम्या