JOIN US
मराठी बातम्या / पुणे / भाजप आमदारानंच मोडला नियम! राम सातपुतेंच्या शाही विवाह सोहळ्यात गर्दी मावेना... पाहा VIDEO

भाजप आमदारानंच मोडला नियम! राम सातपुतेंच्या शाही विवाह सोहळ्यात गर्दी मावेना... पाहा VIDEO

‘दो गज की दूरी जरुरी’, ‘मास्क पेहनना जरूरी है’ असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत आहेत. मात्र, भाजपच्याच नेत्याला त्याचा विसर पडल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 20 डिसेंबर: राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) कमी झाला असला तरी दुसरी लाट येणार असल्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे. ‘दो गज की दूरी जरुरी’, ‘मास्क पेहनना जरूरी है’ असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वारंवार सांगत आहेत. मात्र, भाजपच्याच नेत्याला (BJP Leader) त्याचा विसर पडल्याचं समोर आलं आहे. विवाह सोहळ्यात 200 हून अधिक पाहुणे उपस्थित राहू नये, असा नियम आहे. मात्र, भाजपचे आमदार राम सातपुते (BJP MLA Ram Satpute) यांच्या शाही विवाह सोहळ्यात गर्दी मावत नसल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आवर्जुन हजेरी लावली. हेही वाचा.. मानलं बुवा शिवसेना नेत्याला! लग्नात वायफळ खर्च टाळून सावरला गोरगरिबांचा संसार भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचा शाही विवाह पुण्यात मोठ्या थाटात पार पडला. विवाह सोहळ्याला तोबा गर्दी लोटली होती. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील अशी खास मंडळी उपस्थित होते. पाहुणे तर दुरच पण नेते मंडळींकडूनही मास्क आणि शारीरिक अंतर या नियमांचं पालन झालं नसल्याचं समोर आलेल्या व्हिडिओतून स्पष्ट झालं आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या पुण्यातील शाही विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी झाली. राम सातपुते आणि त्यांच्या भावी पत्नी यांना विवाह सोहळ्याच्या शुभेच्छा देतानाच वधू-वरकडील पाहुणे आणि राजकीय वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. हेही वाचा.. शेतातील उभ्या पिकासह शेतमालकावर केली करणी! पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड कोरोनाबाबत सरकारनं जाहीर केलेल्या निर्बंधाचं या सोहळ्यात अजिबात पालन करण्यात आलं नसल्याचं समजतं. सर्वसामान्य लोकांना विवाह कार्यक्रमात 200 जणांनीच हजर राहायची मर्यादा आहे. कोरोनबाबतचा नियम राजकीय नेत्यांना वेगळा आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगळा आहे का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या