मालेगाव, 20 डिसेंबर: राजकारणी व्यक्तीच्या घरातील लग्न सोहळा म्हटलं की, मोठा थाटबाट आणि वारेमाप खर्च हे ठरलेलं असतं. मात्र काही राजकारणी असे असतात की, थाटबाट न करता गोरगरिबांची मदत करून सामाजिक बांधील जोपासत असतात. याचाच प्रत्यय मालेगाव शहरात (Malegaon City) आला.
बारा बलुतेदार सामाजिक संघटनेचे प्रमुख आणि शिवसेना नेते बंडूकाका बच्छाव (Shiv Sena leader Bandukaka Bacchav) यांनी कन्या प्राजक्ता हिचा विवाह सोहळा (Wedding Marriage) नुकताच पार पडला. बंडूकाका बच्छाव यांनी लग्नाचं औचित्य साधून लग्न सोहळ्यावर होणाऱ्या वायफळ खर्चाला फाटा देत भीषण आगीमुळे उघड्यावर आलेल्या गोरगरिबांना मदतीचा हात दिला. त्यांच्या विस्कटलेला संसार पुन्हा एकदा बसवून दिला.
हेही वाचा...ग्लोबल टिचर अवार्ड मिळवणारे रणजितसिंह डिसले गुरुजींची आणखी एक अचिव्हमेंट
मालेगाव शहरात रमजानपूरा या मुस्लिम बहुल भागातील झोपडपट्टीत काही दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. आगीमुळे उघड्यावर आलेल्या सुमारे 15 कुटुंबाना बंडूकाका बच्छाव यांनी मदतीचा हात दिला. आगीत भस्मसात झालेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी बंडूकाका बच्छाव यांच्याकडून 11 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. विशेष म्हणजे नवदांपत्य प्राजक्ता व प्रतीक यांच्या हस्ते या मदत निधीचं वाटप करण्यात आलं. यावेळी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मानलं बुवा शिवसेना नेत्याला! लग्नात वायफळ खर्च टाळून सावरला गोरगरिबांचा संसार pic.twitter.com/GgAgGegrKt
— News18Lokmat (@News18lokmat) December 20, 2020
दरम्यान, मालेगावातील रमजानपुरा भागात 28 नोव्हेंबरला भरवस्तीत लागलेल्या आगीत 15 ते 20 घरे जाळून खाक झाली होती. अग्निशमन दलासह स्थानिक नागरिकांनी मदत केल्यानंतर आग आटोक्यात आली. सुदैवानं प्राणहानी झाली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. मजूर आणि लूमकामगारांच्या वस्तीतील नागरिकांना या आगीमुळे बेघर व्हावे लागले. सरकारही करणार नाही इतक्या विक्रमी वेळेत मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी नुकसानग्रस्त मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना घर उभारणीसाठी प्रत्येकी कुटुंबाला एक लाखा रुपायांची म्हणजेच जवळपास 11 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली.
हेही वाचा...जयंत पाटलांचं आगळंवेगळं फोटोसेशन, चिमुकल्याच्या आग्रहाखातर दिली अशी पोझ!
मालेगावातील बंडू काका बच्छाव यांच्या प्राजक्ता नावाच्या मुलीचा विवाह आज संपन्न झाला. या लग्नात येणाऱ्या आहेराची संपूर्ण रक्कम घरी घेऊन न जाता या मुस्लिम बांधवांच्या घरांच्या पुराबंधानिसाठी आणि गरिबांचं कल्याणासाठी खर्च करून समाजात नवा आदर्श निर्माण केला आहे. नुकसानग्रस्तांना त्यांचे हक्काचे घर मिळावे यासाठी काकांनी हे मोलाचं सहकार्य केलं. नेहमीच चर्चेत असणाऱ्या मालेगावातील मुस्लिम बहुल भागातील हिंदू-मुस्लिम यांच्या जिव्हाळ्याची ही बा बरंच काही सांगून जाते.