पुणे, 17 ऑगस्ट : जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात करडे गावात भाजप विद्यार्थी आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षासह अन्य एकाविरोधात दमदाटी करण्याबरोबरच खंडणी मागितल्याप्रकरणी शिरुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल निळकंठ घायतडक असं या जिल्हाध्यक्षाचे नाव आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करडे येथे गट नं. 520 येथे फिर्यादी एकनाथ दगडू घायतडक यांची जमीन असून, इतर चार भावांसह एकूण साडे सोळा एकर जमीन आहे. सदर जमिनीत आरोपी विशाल आणि बंटी यांचा काहीही संबंध नसतानाही जमिनीतील 2 ते 4 गुंठे जमीन आम्हाला द्या, अशी वारंवार मागणी आणि धमकी, दमदाटी करत हे दोघे फिर्यादीस खंडणी मागत होते. सदाभाऊ खोतांच्या चालकाची भर चौकात गुंडाने अडवली गाडी, चाकूने केला हल्ला दिनांक 11 ऑगस्ट रोजी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ हे दोघे जण मोटरसायकल वरून करडे येथून शिरूरकडे येत असताना करडे घाटाजवळ आरोपी विशाल आणि बंटी यांनी त्यांची चार चाकी गाडी (एम एच 12 के वाय 5242) या दुचाकीला आडवी मारून दुचाकी थांबविली यातून दोघेही खाली उतरले व त्याने फिर्यादीस ‘तुम्हाला मागितलेली जमीन देत का नाही’ म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी याने या जमिनीमध्ये तुमचा काहीही संबंध नाही, असे सांगितल्यानंतर आरोपी यांनी त्यांच्या गाडीतून हॉकी स्टिक काढून आणली. यामुळे फिर्यादी आणि त्याचा भाऊ घाबरून दुचाकीवर बसून दुचाकीसह निघाले असता आरोपींनी त्यांच्या हातातील हॉकी स्टिक फेकून मारली. आणि ती मोटरसायकलच्या इंडिकेटरवर लागल्याने इंडीकेटर तुटला. कोरोनाही निलेश राणेंना रोखू शकला नाही…शिवसेना नेत्यावर केला शाब्दिक हल्ला याबाबत फिर्यादी यांनी तात्काळ शिरूर पोलीस स्टेशन येथे येऊन फिर्याद दिली असून याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे हे करीत आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्हातील जिल्हाध्यक्षावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत. विशाल घायतडक याच्यावर वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल आहे. आरोपी विशालचे अनेक राजकीय नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध आहे.