सांगली, 17 ऑगस्ट : भाजपच्या घटकपक्षाचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या खासगी गाडीवर असलेल्या चालकावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना इस्लामपूर येथील वाघवाडी रोडवर घडली आहे. भर चौकात गाडी अडवून गुंडाने जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
अनिल पवार हे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या खासगी वाहनाचे चालक आहे. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अनिल पवार आणि त्यांचा एक मित्र असे दोघे जण कारने जात होते. त्यानंतर वाघवाडी रोडवर पेट्रोल पंपावर जात असताना अचानक आरोपी शकील गोलंदाज आणि त्याच्या साथीदार एका कारमधून समोरून आले आणि अडवले.
मोठी बातमी : शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक'वर कोरोनाचा शिरकाव, 2 जणांना झाली लागण
फक्त गाडीला ओव्हरटेक केले या रागातून आरोपींनी अनिल पवार यांच्यावर हल्ला केला. अनिल पवार हे गाडीतून बाहेर उतरले असता आरोपी शकील गोलंदाज याने चाकू भोसकण्याचा प्रयत्न केला. पण, सुदैवाने अनिल पवार यांनी वार चुकवला आणि गाडीत बसले. पण तरीही आरोपीने त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले.
लॉकडाउनच्या मंदीत भामट्यांची संधी, घरात छापल्या 2000 च्या नोटा, पुण्यातच वापरल्या
या घटनेनंतर अनिल पवार यांनी इस्लामपूर पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. अनिल पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शकील गोलंदाज आणि त्याचा साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सलीमला अटकही केली आहे. शकीलला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शकील गोलंदाज हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे. शकीलचा साथीदार फरार असून पोलीस शोध घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: हल्ला