मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोनाही निलेश राणेंना रोखू शकला नाही...लागण झाल्यानंतरही शिवसेना नेत्यावर केला आक्रमक शब्दांत हल्ला

कोरोनाही निलेश राणेंना रोखू शकला नाही...लागण झाल्यानंतरही शिवसेना नेत्यावर केला आक्रमक शब्दांत हल्ला

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर राणे यांच्या शिवसेना विरोधाला आणखीनच धार आली आहे.

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर राणे यांच्या शिवसेना विरोधाला आणखीनच धार आली आहे.

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर राणे यांच्या शिवसेना विरोधाला आणखीनच धार आली आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 17 ऑगस्ट : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Neelesh Rane) हे सुरुवातीपासूनच शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेत आलेले आहेत. त्यातच राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर राणे यांच्या शिवसेना विरोधाला आणखीनच धार आली आहे. नुकताच निलेश राणे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र तरीही ट्विटरच्या माध्यमातून सेना नेत्यांना लक्ष्य करायला ते विसरले नाहीत.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'सामना'तून रोखठोक या सदरात मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. 'तिकडे रशियाने कोरोनाची लस काढली. WHO लाही विचारले नाही. आम्ही मात्र आमच्याच मस्तीत आहोत,' अशी टीका राऊत यांनी केली. राऊत यांच्या टीकेवर पलटवार करण्यासाठी भाजपकडून निलेश राणे पुढे सरसावले.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. 'तू दिल्ली बिल्ली सोड आधी एक निवडणूक लढवून दाखव. मुंबई नाही सांभाळता येत...लागला देशाच्या वार्ता करायला,' अशा खरमरीत शब्दांमध्ये निलेश राणे यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.

याआधीही अनेक नेत्यांवर एकेरी शब्दांमध्ये टीका केल्याने निलेश राणे चर्चेत आले होते. संजय राऊत यांच्यावरही त्यांना अनेकदा अशाच शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

दरम्यान, नुकतंच निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. 'कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारन्टाइनकरून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी,' असं आवाहन निलेश राणे यांनी केलं होतं.

First published:

Tags: Nilesh rane, Shivsena