JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / भाजप नेत्याने केले शरद पवारांचे समर्थन, गोपीचंद पडळकरांना झापले

भाजप नेत्याने केले शरद पवारांचे समर्थन, गोपीचंद पडळकरांना झापले

शेतकऱ्यांच्या प्रश्नी जाण असणाऱ्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसाने टीका करणे योग्य नाही, हे निषेधार्थ आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिर्डी, 30 जून : ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागण झालेले कोरोना आहे’ अशी विखारी टीका करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल राज्यात तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलनं केली. भाजप नेत्यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली. आता भाजपचे नेते मधुकर पिचड यांनी शरद पवारांची बाजू घेत पडळकरांना चांगलेच फटकारून काढले आहे. भाजपचे नेते मधुकर पिचड यांनी पत्र लिहून शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. या पत्रात त्यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबद्दल दु:ख व्यक्त केले. गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालत्या पातळीवर शरद पवार यांच्यावर केलेली टीका माझ्या मनाला दुख देणारी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन झाली आहे. शरद पवारांवर टीका ही दुर्दैवी आहे, असं मत पिचड यांनी व्यक्त केलं. पिंपरी चिंचवडकरांनो, तुम्ही मोडलेल्या नियमांमुळे काय परिणाम झाला हे एकदा वाचाच ‘आपण भाजप पक्षात जी असलो तरी शरद पवार यांच्यासोबत काम केले आहे, त्यांना जवळून पाहिले आहे. त्यांनी सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वच स्तरातील लोकांसाठी भरीव काम केले आहे. त्यांचे हे योगदान नाकारून चालणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नी जाण असणाऱ्या नेतृत्वावर अतिशय छोट्या माणसाने टीका करणे योग्य नाही, हे निषेधार्थ आहे’, अशा शब्दात पिचड यांनी पडळकरांना फटकारून काढले आहे. कोरोनाच्या संकटकाळात पैशांची गरज भासल्यास नो टेन्शन! घरबसल्या SBI देत आहे कर्ज शरद पवार यांच्यावर राजकीय टीका अनेक वेळा झाली असेल पण ते निश्चल आहेत, अशा प्रकारच्या टीकांनी ते कधीच अस्थिर झाले नाहीत. छोट्या कार्यकर्त्यांना माझ्या नेहमी सूचना असतात, मोठ्या माणसांवर बोलताना आपली कुवत पाहून मर्यादा पाळाव्यात, अशी कानउघडणीही पिचड यांनी पडळकरांसह भाजप कार्यकर्त्यांची केली. विशेष म्हणजे, मधुकर पिचड हे पूर्वश्रमाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या