हम नही सुधरेंगे! पिंपरी चिंचवडकरांनो, तुम्ही मोडलेल्या नियमांमुळे काय परिणाम झाला हे एकदा वाचाच

हम नही सुधरेंगे! पिंपरी चिंचवडकरांनो, तुम्ही मोडलेल्या नियमांमुळे काय परिणाम झाला हे एकदा वाचाच

"हम नही सुधरेंगे" अशा आविर्भावात वावरत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरतांना दिसतात.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 30 जून : बेजबाबदारपणे वागणाऱ्या सुमारे 20,000 नागरिकांवर पिंपरी चिंचवड पोलीस आणि महापालिका प्रशासनानं कायदेशीर कारवाई करत त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंडही वसूल केला. मात्र, तरीही काहीजण "हम नही सुधरेंगे" अशा आविर्भावात वावरत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरतांना दिसतात.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने आत्ता पर्यंत तब्बल 70 बळी घेतले.अडीच हजाराहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झालीय तर सुमारे 22 हजारांपेक्षा जास्त जणांना होम कवॉरटाईन केलं गेलं. ही परिस्थिती नक्कीच भयावह आहे मात्र या शहरातील रस्त्यावर आणि बाजारपेठेतील ही गर्दी बघून इथल्या नागरिकांना कोरोनाची भीती आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उभारलेल्य वॉर रूम मधील CCTV चे दृश्य बघून महापालिका कर्मचारी संबधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करतायत, तर सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या आणि विनाकारण गर्दी करत नियम मोडणाऱ्या सुमारे 16 हजार नागरिकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलयते महामारीच्या काळात दाखल झालेल्या गुन्ह्यांची व्याप्ती आणि परिणाम किती मोठे असतात हेही जरा लक्षात घ्या.

हे वाचा-कोरोनाच्या वेगाला छोटा ब्रेक, वाचा 24 तासातली नवीन आकडेवारी

आधी सक्तीचं लॉकडाऊन, पोलिसांकडून काठयांच्या प्रसाद, व्याव्यामा सारख्या शारीरिक शिक्षा, 188 सारखे गंभीर गुन्हे दाखल करुन आणि लाखो रुपयांच्या दंड आकारूनही नागरिक आपली जबाबदारी विसरून कोरोनाला बळी पडणार असतील तर ते अपयश कोरोनाचा विरोधात रात्रंदिवस राबणाऱ्या, डॉक्टर, पोलीस, कर्मचारयांच नक्कीच नसेल. त्यामुळे हे या निमित्याने समजून घेतलं पाहिजे.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 30, 2020, 11:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading