नवी दिल्ली, 30 जून : कोरोनाच्या संकटकाळात (Coronavirus) जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तरी या बँकेमुळे चिंतेचं कारण नाही. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI State Bank of India) त्यांच्या ग्राहकांना घरबसल्या पर्सनल लोन (Personal Loan) देत आहे. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन प्री-अप्रव्हूड लोन मिळवू शकता. केवळ 4 सोप्या स्टेप्समध्ये तुमचे हे काम पूर्ण होईल. हे पर्सनल लोन तुम्ही कोणत्याही वेळी 24X7 प्राप्त करू शकता. ग्राहक केवळ 4 क्लिकमध्ये YONO अॅपच्या माध्यामातून हे लोन मिळवू शकतात.
एसबीआयने (SBI) ने ट्विटरच्या माध्यमातून अशी माहिती दिली आहे की, ग्राहक कर्ज घेण्याची पात्रता SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकतात. याकरता तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून PAPL<space><last 4 digits of Account No.> असा मेसेज 567676 वर करावा लागेल. बँकेचे हे कर्ज निश्चित करण्यात आलेल्या काही मापदंडाच्या आधारे ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाईल.
It only takes 4 clicks to apply for a Pre-Approved Personal Loan via #YONOSBI. Offered only to select customers of the Bank.
SMS PAPL <SPACE> <last 4 digits of SBI a/c no.> to 567676 from your registered mobile number.
— State Bank of India (@TheOfficialSBI) June 27, 2020
या कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी द्यावी लागणारी फी देखील अत्यल्प आहे. त्याचप्रमाणे हे कर्ज मिळवण्यासाठी ग्राहकांना जास्त वेळ वाट देखील पाहावी लागणार नाही.