JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'कंगनाला विरोध म्हणजे डाल में कुछ काला है', चंद्रकांत पाटलांची ठाकरे कुटुंबाला उद्देशून घणाघाती टीका

'कंगनाला विरोध म्हणजे डाल में कुछ काला है', चंद्रकांत पाटलांची ठाकरे कुटुंबाला उद्देशून घणाघाती टीका

‘न्यायालयाने फटकारल्या नंतरच राज्य सरकारला कळतं’ अशा शेलक्या शब्दात टोला लगावत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर आज चौफेर टीका केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 13 सप्टेंबर : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका तर दुसरीकडे मराठा आरक्षण, कंगना विरुद्ध शिवसेना, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि ड्रग्ज असे मुद्दे सगळ्यात जास्त गाजत आहेत. या सगळ्यावरून विरोधकांनी सत्ताधारी ठाकरे सरकारला टार्गेट केलं आहे. ‘न्यायालयाने फटकारल्या नंतरच राज्य सरकारला कळतं’ अशा शेलक्या शब्दात टोला लगावत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर आज चौफेर टीका केली. इतकंच नाही तर बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन उघड होऊ नये म्हणूनच कंगनाला विरोध केला जातो आहे. म्हणजेच दाल मे कुछ काला है आणि त्याची चर्चा चहा पितांना होत असणार असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर या 11 गोष्टींची काळजी घ्या, आयुष मंत्रालयाची सूचना मराठा आरक्षण न देऊन सरकारने पाठीत खंजीर खुपसल्याचंही पाटील म्हणाले. तर पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळायची असल्यास अजित पवारांनी आराडाओरड करून काम करण्याची आपली कार्य पद्धती बदलावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. सध्या भाजपमध्ये खडसे-फडणवीस दरम्यान सुरू असलेला वादावर बोलतांना खडसे यांनी बंद खोलीतीच वाद मिटवयला हवा असं म्हणत फडणवीसांच्या भूमिकेची पाठराखन करायलाही पाटील विसरले नाहीत. शिवसेनेच्या विरोधात कंगनाचं आणखी एक मोठं पाऊल, आज राज्यपाल कोश्यारींची घेणार भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी भाजप तर्फे घेतल्या गेलेल्या सेवा सप्ताहाच्या निमित्ताने अपंगांना आर्थिक मदत आणि वस्तूंच्या वाटप कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी त्यांनी मोदी कसे आत्मनिर्भर आहेत या बद्दलचा किस्सा सांगताना मोदी त्यांना मिळालेल्या भेट वस्तूंचा लिलाव करत असल्याचा अजब किस्साही सांगितला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या