Home /News /news /

कोरोनामुक्त झाल्यानंतर या 11 गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे, आयुष मंत्रालयाची सूचना

कोरोनामुक्त झाल्यानंतर या 11 गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे, आयुष मंत्रालयाची सूचना

कोरोना होऊन गेल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे, यासंबंधी काही नियम जारी करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचं संकट आहे. प्रत्येक आरोग्य संस्था, डॉक्टर, तज्ज्ञ आणि संशोधक या जीवघेण्या आजारावरील लस शोधण्यात व्यस्त आहेत. जसे रोज कोरोनाचे धक्कादायक आकडे समोर येतात तसं संशोधनातूनही कोरोनासंबंधी रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. पण सध्याचा विचार केला तर देशात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना होऊन गेल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे, यासंबंधी काही नियम जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने जे कोरोना रुग्ण बरे झालेले आहेत, त्यांच्यासाठी सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. खरंतर कोरोनातून बरं झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका खूपच कमी असतो असं म्हटलं जातं. पण त्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. अन्यथा कोरोना पुन्हादेखील होऊ शकतो. शिवसेनेच्या विरोधात कंगनाचं आणखी एक मोठं पाऊल, आज राज्यपाल कोश्यारींची घेणार भेट कोरोनातून बरे झाल्यानंतर अशी घ्या आरोग्याची काळजी 1) मास्क वापरत रहावे आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करावे. 2) पुरेसे गरम पाणी प्या. 3) आयुष मंत्रालयाने दिलेली प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घ्या. 4) घरी किंवा ऑफिसमध्ये हळू हळू काम सुरू करा. 5) पुरेशी झोप आणि आराम करा. 6) योगासन करा 7) दररोज योगासने, प्राणायाम आणि ध्यान करा. 8) डॉक्टरांनी शिफारस केलेले श्वास घेण्याचे व्यायाम करा. सुदाम मुंडे हॉस्पिटलमधून 2 महिलांचं गर्भ गायब, कारवाईत धक्कादायक सत्य समोर 9) सकाळी आणि संध्याकाळी चाला. 10) सहज पचले असा आहार घ्या. 11) धूम्रपान आणि मद्यपान पासून अंतर ठेवा. कोरोना पुन्हा होता का? या संदर्भात अहमदाबातमध्ये एक अभ्यास करण्यात आला आहे. त्यात कोरोनामुक्त झालेल्या 40 टक्के रुग्णांच्या शरीरांमधले अँटीबॉडीज संपल्याचं आढळून आलं आहे. अशा रुग्णांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याचा धोका असतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनातून बरे झालेल्या 1 हजार 800 जणांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णांना तेवढीच काळजी घ्यावी लागेल असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या