JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / COVID-19 : तीन भारतीय कंपन्यांना मिळाला NASA चे व्हेंटिलेटर बनवण्याचा परवाना

COVID-19 : तीन भारतीय कंपन्यांना मिळाला NASA चे व्हेंटिलेटर बनवण्याचा परवाना

तीन भारतीय कंपन्याना अमेरिकेच्या ‘नासा’कडून (NASA) कोव्हिड-19 (COVID-19) च्या रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बनवण्याचा परवाना मिळाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 जून : तीन भारतीय कंपन्याना अमेरिकेच्या नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनीस्ट्रेशन अर्थात ‘नासा’कडून (NASA) कोव्हिड-19 (COVID-19) च्या रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बनवण्याचा परवाना मिळाला आहे. या तीन भारतीय कंपन्या अल्फा डिझाइन टेक्नोलॉजीज प्राइव्हेट लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड आणि मेधा सर्व्हो ड्राइव्ह्स प्राइव्हेट लिमिटेड अशा आहेत. नासाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार 3 भारतीय कंपन्यांव्यतिरिक्त अन्य देशातील 18 कंपन्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. यामध्ये 8 कंपन्या अमेरिकेतील आहेत तर 3 कंपन्या ब्राझिलमधल्या आहेत. नासाने दक्षिण कॅलिफोर्नियाच्या जेट प्रॉपल्शन लॅबमध्ये (जेएलपी) कोरोना व्हायरच्या रुग्णांसाठी विशेष स्वरूपात व्हेंटिलेटर विकसीत केला आहे.

संबंधित बातम्या

(हे वाचा- ‘कोरोना हा बायकोसारखा…’ या देशाच्या मंत्र्यांचं वादग्रस्त विधान) जेएलपीच्या इंजिनिअर्सनी एका महिन्यापेक्षा अधिका काळासाठी काम करून ‘व्हायटल’ (Ventilator Intervention Technology Accessible Locally) या विशेष व्हेंटिलेटरचे डिझाइन बनवले आहे. 30 एप्रिल रोजी या व्हेंटिलेटर्सना अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून आपात्कालीन वापराची परवानगी मिळाली आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार याची निर्मिती फिजिशियन आणि मेडिकल उपकरणं बनवणाऱ्या मन्यूफॅक्चररचा सल्ला घेऊन हे व्हेंटिलेटर बनवण्यात आले आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे आतापर्यंत अमेरिकेमध्ये 1,02,836 लोकांचा मृत्यू झाला आहे तर संक्रमित लोकांचा आकडा 17 लाखांच्या वर आहे. (हे वाचा- डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, अमेरिकेचे WHO बरोबरचे संबंध संपुष्टात)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या