नवी दिल्ली, 30 मे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus)च्या मुद्द्यावरून चीनवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. त्याचप्रमाणे ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे (World Health Organization WHO) संबध संपुष्टात आणले आहेत. त्यानी WHO मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चीनवर हल्लाबोल करत ट्रम्प यांनी असे म्हटले आहे की, चीनने जागतिक आरोग्य संघटनेची दिशाभूल केली आहे. चीन नेहमीच काही गोष्टी लपवत आला आहे. कोरोना विषयावर चीनकडून उत्तर मिळणे आवश्यक आहे. त्यांना संपूर्ण जगासमोर उत्तर द्यावे लागेल. त्याचप्रमाणे ट्रम्प पुढे म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटना पूर्णपणे चीनच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे आम्ही जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे नाते संपुष्टात आणत आहोत.
US President Donald Trump announced that his country is terminating its relationship with the World Health Organisation (WHO).
— ANI Digital (@ani_digital) May 29, 2020
Read @ANI Story | https://t.co/Kzk4TAt9J6 pic.twitter.com/OVK90GqVqx
‘चीनकडून जागतिक आरोग्य संघटनेसाठी प्रतिवर्षी केवळ 40 मिलियन डॉलर इतकी रक्कम दिली जाते तर अमेरिकेडून दिली जाणारी रक्कम वार्षिक सुमारे 450 मिलियन डॉलर आहे, तरी देखील चीनचे जागतिक आरोग्य संघटनेवर नियंत्रण आहे’, अशा शब्दात ट्रम्प यांनी चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर टीका केली आहे. (हे वाचा- कोरोना व्हायरसवर 5 महिन्यात येणार औषध, या अमेरिकन कंपनीचा दावा ) ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही WHO कडे सुधारणांसाठी प्रस्ताव ठेवला होता, मात्र त्यांनी त्याची अंमलबजावणी नाही केली आणि म्हणूनच आम्ही WHO बरोबरचे सर्व संबंध संपवत आहोत’.
डोनाल्ड ट्रम्प असे म्हणाले की, ‘चीनकडून ‘वुहान व्हायरस’ला कव्हर-अप करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यामुळे हा आजार संपूर्ण जगभर पसरून आंतरराष्ट्रीय महामारी निर्माण झाली. यामुळे अमेरिकेत 1 लाख लोकांचे प्राण गेले आहेत तर जगभरात देखील हाहाकार माजला आहे. याप्रकरणी जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले. चीनच्या चुकीची शिक्षा सर्व जगाला भोगावी लागत आहे.’ (हे वाचा- मधुमेह रुग्णांसाठी कोरोना घातक, 10 पैकी एकाचा मृत्यू होत असल्याचं अभ्यासात समोर )