'कोरोना हा बायकोसारखा...' या देशाच्या मंत्र्यांचं वादग्रस्त विधान, महिला संघटनांकडून टीका

'कोरोना हा बायकोसारखा...' या देशाच्या मंत्र्यांचं वादग्रस्त विधान, महिला संघटनांकडून टीका

इंडोनेशिया (Indonesia)च्या एका मंत्र्याने कोरोना व्हायरस (Coronavirus) संदर्भात एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी कोरोनाव्हायरसला 'पत्नी'ची उपमा दिली आहे.

  • Share this:

जकार्ता, 30 मे : इंडोनेशिया (Indonesia)च्या एका मंत्र्याने कोरोना व्हायरस (Coronavirus) संदर्भात एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी कोरोनाव्हायरसला 'पत्नी'ची उपमा दिली आहे. त्यांच्या समर्थकांकडून असं सांगण्यात येत आहे की कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भय निर्माण झाले आहे, ते दूर करण्यासाठी असं वक्तव्य केलं आहे. मात्र यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. इंडोनेशियातील काही महिला संघटनांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी या विधानाची जोरदार टीका केली आहे. इंडोनेशियाचे सुरक्षा मंत्री (Security Minister) महमूद महफूद एमडी यांना ही गंमत अडचणीत आणणारी ठरण्याची शक्यता आहे. एका विद्यापीठामध्ये ऑनलाइन संभाषण करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

महमूद एमडी आपल्या भाषणात असं म्हणाले की, नेहमीसाठी आता कोरोनाचा सामना करावा लागणार आहे. परिस्थितीशी जुळवून घेत लोकांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे

(हे वाचा-डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, अमेरिकेचे WHO बरोबरचे संबंध संपुष्टात)

त्यानंतर त्यांनी असे सांगितले की त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना एक मजेशीर बाब सांगितली. ती म्हणजे, 'कोरोना हा बायकोसारखा आहे. सुरूवातीला तुम्ही त्याला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करता. त्यानंतर तुम्हाला कळून चुकतं की हे शक्य नाही आहे. त्यानंतर तुम्ही त्याबरोबरच जगणं शिकता.'

सुरक्षा मंत्र्यांवर टीका करणारे त्यांच्या या वक्तव्याला 'सेक्सिस्ट कमेंट' म्हटलं आहे. टीकाकारांनी असे म्हटले आहे की जकार्ता प्रशासन कोरोनाच्या संकटाशी लढण्यास अयशस्वी झाल्याने अशा पद्धतीची वक्तव्य करून वातावरण हलकं-फुलकं करण्यात येत आहे.

एएफफीच्या एका अहवालानुसार महिलांच्या एका संघटनेच्या नेतृत्व करणाऱ्या डिंडा निसा म्हणाल्या की, 'हे वक्तव्य कोरोना व्हायरसला संपवण्यासाठी चालू असणाऱ्या सरकारच्या प्रयत्नांचे अपयश दाखवते. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांची मानसिकता देखील यातून कळून येते. हे सेक्सिस्ट आणि अशोभनीय वक्तव्य आहे.'

(हे वाचा-मधुमेह रुग्णांसाठी कोरोना घातक, 10 पैकी एकाचा मृत्यू होत असल्याचं अभ्यासात समोर)

होत असलेल्या टीकेबाबत मंत्री महमूद यांच्याकडून अद्याप कोणते स्पष्टीकरण आलेले नाही. दरम्यान इंडोनेशियामध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे. सोशल डिस्टिंसिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी सरकारकडून 3 लाख 40 हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत 24 हजार कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

First published: May 30, 2020, 10:26 AM IST

ताज्या बातम्या