एक कप चहाने तोडलं डॉक्टर बनण्याचं स्वप्न (प्रतिकात्मक फोटो)
नवी दिल्ली 08 जून : इंग्रजांनीच भारतात चहा आणला असं म्हणतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रज भारत सोडून गेले, पण त्यांनी आणलेल्या चहाची चव लोकांपासून वेगळी होऊ शकली नाही. भारतात क्वचितच असं घर असेल ज्यात रोज चहा बनत नाही. मात्र राजस्थानची राजधानी जयपूरजवळील बस्सी या छोट्याशा गावात, एका विद्यार्थीनीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न मात्र या चहामुळे अर्ध्यातच अडकल्याचं पाहायला मिळालं. आता या पीडित विद्यार्थिनीने मदतीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बस्सी येथील रहिवासी असलेल्या 18 वर्षीय दिशाने 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गात 100 टक्के गुण मिळवले होते. या होतकरू विद्यार्थिनीने डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ती यासाठी तयारीही करत होती. मात्र परीक्षेदरम्यान तिच्यासोबत भलतंच काहीतरी घडलं. पेपरसाठी वर्गात आलेल्या पर्यवेक्षकाच्या चुकीची शिक्षा तिला मिळाली. परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षक चहाचा आस्वाद घेत होते. जिद्द लागते! 10 वर्ष अभ्यास केला आणि अखेर हवालदाराला आज सगळेच मारताय सॅल्युट! दिशाने तिच्या याचिकेत म्हटलं आहे की, तिच्या ओएमआर शीटवर निरीक्षकाचा चहा सांडला होता, चहा सांडल्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे पुसली गेली होती. NEET परीक्षेत तिला 470 गुण मिळाले असल्याचे विद्यार्थिनीचे म्हणणे आहे. त्यामुळे तिची एमबीबीएसची जागा हुकली आहे. तिला पशुवैद्यकीय, बीडीएस, बीएससी आणि नर्सिंगसाठी जागा मिळत आहेत. असं असतानाही निरिक्षकाने तिला अतिरिक्त पाच मिनिटं दिली नाहीत, असं विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात सांगितलं. या सगळ्यात तिचे 17 प्रश्न सुटले, ज्याची उत्तरं तिला माहिती होती. याची उत्तरं तिने लिहिली असती तर नक्कीच तिला निकालात फायदा झाला असता. दिशाच्या तक्रारीवरून उच्च न्यायालयाने परीक्षा आयोजित करणाऱ्या एनटीएला त्यांच्या मूळ ओएमआर शीटसह संपूर्ण रेकॉर्ड सादर करण्यास सांगितलं आहे. यासोबतच परीक्षा केंद्रावरील शाळेच्या मुख्याध्यापकांना पुढील तारखेला 4 जुलै रोजी खोलीत लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.