JOIN US
मराठी बातम्या / देश / पावसात बिळाबाहेर पडलेत साप; चावलाच तर करावं काय? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

पावसात बिळाबाहेर पडलेत साप; चावलाच तर करावं काय? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

साप चावू नये यासाठी काळजी घ्या. पावसाळ्यात अंधारात जपून चाला. कोणत्याही वस्तूला स्पर्श करताना, ती उचलताना सावधगिरी बाळगा.

जाहिरात

कॉमन क्रेट, रसेल व्हायपर आणि नाग या सापांच्या विषारी प्रजाती आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

तारा ठाकूर, प्रतिनिधी पंचकुला, 13 जुलै : पावसाळ्यात साप, विंचू बिळाबाहेर येतात. त्यामुळे घरात स्वच्छता ठेवावी लागते. कपाटाखाली किंवा अडगळीत साप तर दडून बसला नसेल ना अशी भीती वाटते. परंतु तुम्हाला माहितीये? सर्व साप विषारी नसतात, त्यापैकी काही साधेही असतात. परंतु साप तो साप होता है, भीती तर वाटणारच. मात्र घाबरून जाऊन नका. साप चावल्यावर नेमकं काय करावं, हे जाणून घ्या. पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील एका घरात साप आढळल्याने सर्पमित्र सलीम तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी प्रत्येक साप विषारी नसतो हे सर्वांना माहिती असणं आवश्यक असल्याचं म्हटलं. कारण ‘साप चावण्यापेक्षा घाबरूनच व्यक्तीचा मृत्यू होतो’, असं त्यांनी सांगितलं. ‘म्हणून घाबरण्यापेक्षा सर्पमित्रांशी संपर्क साधा’, असा सल्लाही त्यांनी दिला.

‘कॉमन क्रेट, रसेल व्हायपर आणि नाग या सापांच्या विषारी प्रजाती आहेत. त्यामुळे साप चावल्यावर तो नेमका कोणत्या प्रजातीचा आहे हे लक्षात घ्या. मात्र त्याआधी साप चावू नये यासाठी काळजी घ्या. पावसाळ्यात अंधारात जपून चाला. कोणत्याही वस्तूला स्पर्श करताना, ती उचलताना सावधगिरी बाळगा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे साप चावल्यावर घरगुती उपाय अजिबात करू नका, विष काढणाऱ्यांकडे जाऊन अंधश्रद्धेला बळी पडू नका. तर, थेट रुग्णालय गाठा’, असं सर्पमित्र सलीम यांनी सांगितलं. ‘लोकांनी नेमका कोणता साप चावला हे डॉक्टरांना सांगितलं, तर वेळेत योग्य उपचार करता येतील’, असं ते म्हणाले. झोपेत डसतात, रक्ताच्या गुठळ्या करतात; भारतात आढळतात हे 13 विषारी साप सलीम हे मागील 30 वर्षांपासून सर्पमित्राचं काम करत आहेत. त्यांना जवळपास भारतातले सर्व प्रकारचे साप पकडण्याचा अनुभव आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी साप डसल्यास त्या जागी सूज येते, सदर व्यक्तीला मळमळ आणि उलटीसारखं वाटू लागतं, अंग अडकल्यासारखं होतं. साप चावलेला भाग लालसर होऊ लागतो, तिथे आग होऊ लागते, रक्तस्त्राव होतो, व्यक्तीला ताप येतो, पोटदुखी, डोकेदुखी जाणवते, कमकुवतपणा येतो, भरपूर तहान लागते, व्यक्ती घामाघूम होते आणि शरीराचे काही भाग सुन्न पडण्यास सुरुवात होते, इत्यादी लक्षणं जाणवतात. या लक्षणांवरूनही आपण चावलेला साप विषारी आहे की नाही, याचा अंदाज लावू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या