अनुप पासवान, प्रतिनिधी कोरबा, 2 जून : अनेक प्राणी असे असतात जे वर्षभर बिळात दडून पावसाळ्यातच बाहेर पडतात, जसं की बेडूक. तर काही प्राणी असेही असतात, जे वर्षभर बाहेर फिरतात, परंतु पावसाळ्यात त्यांचा जोर आणखी वाढतो, जसं की साप. जंगलांशेजारी किंवा गावात राहणाऱ्या लोकांना सापाचा धोका सर्वाधिक असतो. काही लोक साप चावला की, घरगुती उपाय करतात. काही लोक तर, अंधश्रद्धेला बळी पडून साप चावलेल्या जागेवर मंत्रोच्चार करतात. ज्यात त्यांचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे हे सर्व उपाय करण्यात वेळ न घालवता साप चावल्यावर त्वरित रुग्णालय गाठावं, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कोरबा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक चंद्रकांत भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात 13 प्रजातींचे विषारी साप आढळतात. त्यापैकी चार अत्यंत धोकादायक प्रजाती मानल्या जातात. त्यात कोब्रा म्हणजेच नाग, रसेल व्हायपर, सॉ-स्केल्ड व्हायपर आणि करैत या प्रजातींचा समावेश होतो. यातही नाग आणि करैत सर्वाधिक धोकादायक असतात.
सापांमध्ये हिमोटॉक्सिक, न्यूरोटॉक्सिक आणि मायोटॉक्सिक असे तीन प्रकारचे विष असतात. हिमोटॉक्सिक विष रक्त पेशींवर हल्ला करतं. त्यामुळे साप चावलेल्या व्यक्तीच्या शरीरातून विविधमार्गे रक्तस्त्राव होणं, रक्ताच्या उलट्या होणं अशी लक्षणं दिसून येतात. तर, न्यूरोटॉक्सिक विष मज्जासंस्थेवर हल्ला करतं. Viral Memes on Maharashta Politics : होऊ दे व्हायरल! Ajit Pawar यांच्या बंडानंतर सोशल मीडियावर मीम्सचं वादळ सापांच्या चार धोकादायक प्रजाती सविस्तर जाणून घेऊया… नाग (कोब्रा) नाग चावल्यानंतर काही वेळातच व्यक्तीची मज्जासंस्था काम करणं थांबवते आणि व्यक्तीला अर्धांगवायू होतो. त्यात मज्जासंस्था आणि हृदयावर हल्ला करणारं विष असतं. या विषामुळे दृष्टीही कमी होऊ शकते. रसेल व्हायपर अजगरासारखा दिसणारा हा साप चावल्यास त्याचं विष व्यक्तीच्या शरीरात 120 ते 250 ग्रॅम आत शिरतं. या सापामध्ये हिमोटॉक्सिक विष असतं, त्यामुळे व्यक्तीच्या हृदयाचे ठोके थांबतात आणि रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात. शिवाय हळूहळू एक-एक अवयव निकामी झाल्याने व्यक्तीचा मृत्यू होतो. सॉ-स्केल्ड व्हायपर हा साप प्रामुख्याने राजस्थानच्या डोंगराळ भागात आढळतो. इतर सापांच्या तुलनेत त्याची लांबी कमी असते. मात्र करड्या रंगावर काळे, पांढरे डाग असल्यामुळे तो दिसायला अतिशय किळसवाणा दिसतो. शिवाय लांबीने लहान असल्याने तो इतरांच्या तुलनेत झपकन हल्ला करतो. करैत हा साप मुख्यतः रात्रीच्या अंधारात बिळाबाहेर पडतो. तो व्यक्ती झोपेत असताना तिच्यावर हल्ला करतो. महत्त्वाचं म्हणजे तो चावल्यावर केवळ डास चावल्यासारखं जाणवतं, मात्र त्याचं विष शरीरात पसरून झोपेतच व्यक्तीचा मृत्यू होतो. म्हणूनच हा भारतातला सर्वात खतरनाक साप मानला जातो. तो दिसायला अतिशय सडपातळ आणि प्रचंड लांब दिसतो. त्याच्या काळ्या शरीरावर दोन-दोन पांढरे पट्टे असतात. साप चावल्यावर नेमकं काय करावं? ज्या व्यक्तीला साप चावला असेल, तिला एकाच जागेवर झोपून ठेवावे, जेणेकरून चालण्या-फिरण्याने विष तिच्या शरीरभर पसरणार नाही. त्या व्यक्तीला घाबरू देऊ नये. घाबरल्याने तिच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरू होतो, जे अत्यंत धोकादायक ठरतं. ज्या ठिकाणी साप चावला असेल, त्याच्या खाली आणि वर घट्ट पट्टी बांधावी, जेणेकरून तिथलं रक्त शरीराच्या इतर भागात पोहोचणार नाही. साप चावलेली जागा साबणाने स्वच्छ धुवावी आणि शक्य तितक्या लवकर त्या व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जावं. डॉक्टर अँटीव्हेनम इंजेक्शन देतात. वेळेत उपचार झाल्यास त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो.