JOIN US
मराठी बातम्या / देश / एक कप चहा, कायदे जाणून घ्या! 'असा' आहे हा वकील चहावाला

एक कप चहा, कायदे जाणून घ्या! 'असा' आहे हा वकील चहावाला

अखेर त्यांनी निर्णय घ्यायचं ठरवलं. नोकरी सोडून चहाची टपरीच उघडली आणि मग त्यांना नाव पडलं ‘वकील चहावाला’.

जाहिरात

ते येथे चहा प्यायला येणाऱ्या सर्वांच्या अडचणी जाणून घेतात, त्यांवर उपाय सुचवतात.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आदित्य तिवारी, प्रतिनिधी भोपाळ, 28 जून : आवड आणि निवड हे दोन शब्द जरा सारखे दिसत असले तरी त्यांच्यात फार फरक आहे. आवडती गोष्ट निवडणं आणि निवडलेली गोष्ट आवडणं, हाच तो फरक. करिअरच्या, कामाच्या बाबतीत तो ठळकपणे जाणवतो. मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळच्या एका चहावाल्यासोबतही असंच काहीसं झालं. खलील असं या चहावाल्याचं नाव. ते भोपाळच्या एका कार्यालयात चांगल्या पगारची नोकरी करायचे. मात्र काही केल्या तिथे त्यांचं मन रमायचं नाही. मग सगळं काम सोडून ते जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर जाऊन बसायचे. कार्यालयाचं काम अपूर्ण सोडून ते घरी जायचे. एके दिवशी त्यांच्या मालकाने त्यांना बजावलं, ‘एकतर व्यवस्थित काम कर किंवा टपरी उघडून चहा विकायला सुरुवात कर’, असा दमच त्यांना दिला. तेव्हा खलील यांनी निर्णय घ्यायचं ठरवलं. त्यांनी नोकरी सोडून चहाची टपरीच उघडली आणि मग त्यांना नाव पडलं ‘वकील चहावाला’. कसं? पाहूया…

खलील यांना लहानपणापासूनच गप्पा मारण्याची फार आवड. एखाद्या विषयावर प्रमाणाबाहेर चर्चा करण्याच्या त्यांच्या सवयीला कुटुंबीय आणि मित्रमंडळी कंटाळायचे. खलील सारखे संदर्भासहीत स्पष्टीकरण देत असत. त्यामुळे सगळे त्यांना वकील बोलायचे. मग आपल्या टपरीचं नावही त्यांनी ‘वकील चहावाला’ असंच ठेवलं. येथे चहा प्यायला येणाऱ्या सर्व ग्राहकांशी ते गप्पा मारतात. त्यांच्या अडचणी जाणून घेतात, त्यांवर उपाय सुचवतात. वकिलाप्रमाणे त्यांना कोणत्या गोष्टीचे काय परिणाम होतात, याबाबत सल्लेही देतात. प्रेम एवढं क्रूर असतं का? लेकानेच दिली आईची सुपारी; कारण वाचून बसेल धक्का दरम्यान, आज 25 वर्षांपासून खलील चहा विकत आहेत. त्यांच्या दुकानात 10 रुपयांना आलं-वेलची घातलेला स्पेशल चहा मिळतो. दररोज जवळपास 1 हजार ग्राहक येथे चहा प्यायला येतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत खलील आवडीने हा व्यवसाय सांभाळतात. संध्याकाळी तर ग्राहकांची गर्दी आणखी वाढते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या