जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / प्रेम एवढं क्रूर असतं का? लेकानेच दिली आईची सुपारी; कारण वाचून बसेल धक्का

प्रेम एवढं क्रूर असतं का? लेकानेच दिली आईची सुपारी; कारण वाचून बसेल धक्का

मित्रांनीही त्याला अडवलं नाही, या क्रूर कारस्थानात त्याची साथ दिली.

मित्रांनीही त्याला अडवलं नाही, या क्रूर कारस्थानात त्याची साथ दिली.

पोलीस तपासातून ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं आणि एक असं सत्य बाहेर आलं ज्याचा तुमच्या-आमच्यासारखे सामान्य लोक विचारही करू शकत नाहीत.

  • -MIN READ Local18 Meerut,Uttar Pradesh
  • Last Updated :

निखिल अग्रवाल, प्रतिनिधी मेरठ, 28 जून : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. परंतु प्रेम हे केवळ प्रियकर आणि प्रेयसीमध्येच असतं का? एका प्रेमाच्या नात्यासाठी दुसऱ्या प्रेमाच्या नात्याचा जीव घेतला जातो का? असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका नराधम लेकाने प्रेयसीला आईचा विरोध म्हणून आईच्याच हत्येची सुपारी दिल्याची घटना घडली. मेरठच्या किठौर भागात राजबाला नामक एक महिला राहायच्या. 10 एप्रिलला काही लोकांनी घरात घुसून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल झाली. पोलीस तपासातून ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं आणि एक असं सत्य बाहेर आलं ज्याचा तुमच्या-आमच्यासारखे सामान्य लोक विचारही करू शकत नाहीत.

News18लोकमत
News18लोकमत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजबाला यांचा मुलगा संचित याचं एका मुलीवर प्रेम होतं. राजबाला यांना प्रेमविवाहाबाबत काही अडचण नव्हती, मात्र आपल्या मुलाने आपल्याच समुदायातील मुलीशी लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती. परंतु संचितची प्रेयसी वेगळ्या समुदायातील होती. त्यामुळे तिच्याशी लग्न करण्यास राजबाला यांनी संचितला नकार दिला होता. त्यावरून आई आणि मुलामध्ये जोरदार खटके उडायचे. शिवाय राजबाला यांनी संचितच्या कामातही लक्ष घालायला सुरुवात केली होती. त्या त्याच्या बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवून असायच्या. यावरून संचितचा प्रचंड संताप व्हायचा. रागाच्याभरात त्याने एकदा टोकाचं पाऊल उचललं, आपल्या आईचा काटा काढायचं ठरवलं. लग्नाच्या रात्री मिठाई आणायला गेला नवरा, परत आलाच नाही; नवरीच्या जीवाची घालमेल संचितने त्याच्या मित्रांनाच आईच्या हत्येची सुपारी दिली. मित्रांनीही त्याला अडवलं नाही, तर या क्रूर कारस्थानात त्याची साथ दिली. संचितकडून 2 लाखांची सुपारी घेऊन त्यांनी राजबाला यांच्यावर घरात घुसून हल्ला केला. पोलिसांनी आमिर आणि राशिद या नराधमांना ताब्यात घेतल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. आता या दोघांसोबत संचितही तुरुंगात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात