JOIN US
मराठी बातम्या / देश / Budget 2020 : 'बजेट'मधल्या या आहेत 15 महत्त्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

Budget 2020 : 'बजेट'मधल्या या आहेत 15 महत्त्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

आत्तापर्यंतचं हे सर्वात मोठं बजेट भाषण होतं. त्यांनी जवळपास पावणे तीन तास भाषण केलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 01 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकार 2.0चं पहिलं पूर्ण बजेट सादर केलं. आत्तापर्यंतचं हे सर्वात मोठं बजेट भाषण होतं. या आधी जसवंतसिंह यांनी 2003मध्ये 2 तास 13 मिनिचं भाषण केलं होतं. सीतारामण यांनी 11 वाजता भाषण सुरु केलं. हे भाषण पावणे तीन तास चाललं. सरकारचं लक्ष लागलं होतं ते टॅक्सच्या फेररचनेकडे त्यात त्यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिलाय. हे बजेट विकासाला चालना देणारं आहे अशी प्रतिक्रिया सत्ताधारी नेत्यांनी व्यक्त केलीय तर हे बजेट सुमार दर्जाचं आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षांनी व्यक्त केलीय. या आहेत बजेटमधल्या महत्त्वाच्या गोष्टी करदात्यांना सरकारने दिला मोठा दिलासा - 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त होणार, 7.5 ते 10 लाखापर्यंत 15 टक्के कर, 10 ते 12.5 लाख उत्पन्न 20 टक्के कर, 12. 5 त 15 लाख उत्पन्न - 25 टक्के कर, 50 लाखाच्या वर उत्पनन 50 टक्के कर बँक बुडाली तर तुमच्या 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षीत राहणार, आत्तापर्यंत फक्त एक लाखांची हमी सरकारने दिली होती. PMC बँक बुडाल्यानंतरचा महत्त्वाचा निर्णय. LICचे IPO सरकार बाजारात आणणार, LICतला सरकार आपला मोठा हिस्सा विकून सरकार निधी गोळा करणार. STसाठी 53,700 कोटी तर SC आणि OBCसाठी 85 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. Union Budget 2020: इनकम टॅक्सचे नवे 5 स्लॅब, तुम्हाला किती कर भरावा लागणार? मुंबई आणि दिल्लीदरम्यान एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. 2023 पर्यंत हा एक्सप्रेसवे तयार होणार असून दोन्ही शहरांमधलं अंतर हे फक्त 12 तासांवर येणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी 2500 कोटी. महिलांच्या विविध योजनांसाठी 28 हजार 600 कोटींची तरतूद ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसंदर्भआत विविध योजनांसाठी 9 हजार 500 कोटींची तरतूद. 1 लाख ग्राम पंचायतींना फायबर कनेक्टिवीटीने जोडणार. भारत नेट कार्यक्रमासाठी 6000 कोटींची तरतूद तीन वर्षांमध्ये वीजेची जुनी मीटर बदलविणार, स्मार्ट मीटर बसवणार. Budget 2020 : सरकार LIC मधील भागीदारी विकणार 550 रेल्वे स्टेशनवर वायफायची सुविधा. ‘तेजस’सारख्या आणखी ट्रेन सुरु करणार 100 लाख कोटींचा नॅशनल इन्फ्रास्ट्र्कचर फंड उभारणार. त्यातून देशात पायाभूत सुविधांचं जाळ निर्माण करणार. गरीब विद्यार्थ्यांसाठी पदवीपर्यंत ऑनलाईन शिक्षणाची मोफत सोय करणार. शिक्षण क्षेत्रात FDI च्या निर्णयाला मंजूरी. त्यामुळे नव्या शैक्षणिक संस्था निर्माण होणार.

Budget 2020: दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे लवकरच होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

घराघरात नळानं पाणीपुरवठा करण्यासाठी 3.6 लाख कोटीची तरतूद. जल जीवन मिशनसाठी 3.6 लाख कोटीची तरतूद. सरकार 20 लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप देणार. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करणार. शेतकऱ्यांसाठी 16 कलमी योजना.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या