Budget 2020 : सरकार LIC मधील भागीदारी विकणार

Budget 2020 : सरकार LIC मधील भागीदारी विकणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 (Budget 2020) मध्ये LIC बाबत अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 (Budget 2020) मध्ये LIC बाबत अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. सीतारामन यांनी सांगितल्यानुसार देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC मधील आपली भागीदारी सरकार विकणार आहे. इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO) च्या माध्यमातून सरकारने आपली LICमधील भागीदारी विकण्याची घोषणा केली आहे. LIC मधील आपली भागीदारी विकून सरकार फंड जमा करण्याच्या विचारात आहे.

(हेही वाचा : Budget 2020: दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे लवकरच होणार, अर्थमंत्र्यांची घोषणा )

सध्या भारतीय आयुर्विमा महामंडळातील सरकारची भागीदारी 100 टक्के आहे. एलआयसीमधील आपली भागीदारी विकल्यानंतर त्याचा समावेश निर्गुंतवणूक धोरणांच्या यादीत करण्यात येईल. त्याचप्रमाणे सरकारने आयडीबीआय (IDBI Bank) बँकेतील आपली शिल्लक भागीदारी विकण्याचाही निर्णय घेतला आहे.

First published: February 1, 2020, 1:32 PM IST

ताज्या बातम्या