नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman)आज दुसरा अर्थसंकल्प (Budget 2020) सादर करतायत. अर्थमंत्र्यांनी हायवे, इकॉनॉमिक कॉरिडॉर्स तयार करण्याची मोठी घोषणा केली आहे. यामध्ये दिल्ली- मुंबई एक्सप्रेस वे ची मोठी घोषणा करण्यात आली आहे. 1.7 लाख कोटी रुपये संरचनात्मक कामासाठी खर्च करण्यात येतील. यामध्ये मुंबई - दिल्ली एक्सप्रेस वे आणि चेन्नई - बंगळुरू एक्सप्रेस वे चा समावेश आहे. दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे 2023 पर्यंत तयार होईल, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या. 2500 किलोमीटरचे एक्सप्रेस वे, 9 हजार किमीचे इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि 2 हजार किमीचे स्ट्रॅटेजिक हायवे या सगळ्याचा समावेश आहे. ही कामं 2024 पर्यंत पूर्ण होतील. त्याचबरोबर 6 हजार किमीचे हायवेही बनवण्यात येणार आहेत.
Finance Minister Nirmala Sitharaman: 100 more airports to be developed by 2024 to support Udaan scheme pic.twitter.com/awQx2ofGQ6
— ANI (@ANI) February 1, 2020
FM Nirmala Sitharaman - #BudgetSession2020: The Delhi-Mumbai Expressway will be completed by 2023 pic.twitter.com/i9pWLLwIua
— ANI (@ANI) February 1, 2020
(हेही वाचा ; Budget 2020: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मेगाप्लॅन, 16 कलमी कार्यक्रम) याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक हायवेची घोषणा केली आहे. रस्त्यांवर विजेच्या तारांचं जाळं तायर करून त्या ऊर्जेवर हे इ हायवे चालणार आहेत. मोदी सरकारने संरचनात्मक कामावर जास्त भर दिला असून या अर्थसंकल्पातही त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे याचाच एक मुख्य भाग आहे. अशा रस्त्यांचं जाळं विणलं तर शीघ्रगतीने विकास होईल. ==========================================================================