हा ऐतिहासिक तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे.
कासिम खान, प्रतिनिधी नूह, 27 जून : हरियाणातील नूह जिल्हा अनेक ऐतिहासिक स्थळांचा साक्षीदार आहे. परंतु यापैकी अनेक स्थळांची सध्या जीर्णावस्था झाल्याचं दिसून येतं. असाच एक ऐतिहासिक वारसा म्हणजे नूहमधील सेठ चुहिमलचा तलाव. सेठ चुहिमलचा तलाव त्याच्या सौंदर्यामुळे आणि घुमटात केलेल्या रंगकामामुळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो, मात्र हा सुंदर वारसा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या तलावाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.
चुहिमल तलावाची अनेक वैशिष्ट्य आहेत. या तलावाचं पाणी कधीच आटत नाही. म्हणूनच तलाव वर्षानुवर्षे टिकून आहे. मात्र देखभालीअभावी हे पाणी आता अस्वच्छ झालं आहे. तलावावरील घुमटात अजिंठा-एलोराच्या लेण्यांमध्ये कोरलेल्या चित्रांप्रमाणे नक्षीकाम केलेलं आहे. शिवाय याठिकाणी एक मोठी गुहादेखील आहे. या गुहेतील रस्ता चुहिमलच्या वाड्यापर्यंत जातो. या गुहेतून चुहिमल हा श्रीमंत माणूस तलावावर आंघोळीसाठी येत असे. सध्या त्याच्या सातव्या पिढीचे वंशज मास्टर चंद्रभान या तलावाची देखभाल करतात. Gingr Water : 10 रुपयांची ही वस्तू शुगर-कोलेस्ट्रॉल करेल कंट्रोल! हे आहेत मोठे 4 फायदे, तब्येतीचा ताण होईल दूर स्थानिकांकडून वारंवार हा ऐतिहासिक तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. सरकारने या तलावास पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले, तर नूह जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळेल, पर्यटन व्यवसायही वृद्धिंगत होईल आणि त्यातून सरकारचा महसूल वाढेल. शिवाय हा ऐतिहासिक वारसा जतन करता येईल, असं नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान, सरकारने असंच दुर्लक्ष केलं तर भावी पिढ्यांना एक ऐतिहासिक वास्तू केवळ पुस्तकातच पाहायला मिळेल, असंही लोकांनी म्हटलं आहे.