सर्वात आधी तिने नेपाळला जाण्यासाठी 15 दिवसांचा ट्युरिस्ट व्हिसा मिळवण्यासाठी प्रयत्न केले.
नवी दिल्ली, 25 जुलै : सचिनच्या प्रेमापोटी पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत सध्या दररोज नवे खुलासे होत आहेत. अशातच आता सीमाच्या प्लॅन ‘बी’ची माहितीही समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतात शिरण्यासाठी सीमाने मोठा प्लॅन रचला होता. सर्वात आधी तिने नेपाळला जाण्यासाठी 15 दिवसांचा ट्युरिस्ट व्हिसा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. हा व्हिसा तिला सहज मिळाला. कारण त्यापूर्वी 10 मार्च रोजी 7 दिवसांचा ट्युरिस्ट व्हिसा मिळवून ती नेपाळला गेली होती. तिथे 17 मार्चपर्यंत सचिनसोबत राहिली. याच व्हिसामुळे तिला 15 दिवसांचा ट्युरिस्ट व्हिसा मिळवण्यात फार काही अडचण आली नाही.
सीमा आपल्या 4 मुलांना घेऊन मे महिन्यात पाकिस्तानातून नेपाळमध्ये दाखल झाली. नेपाळमध्ये तिच्याकडे 15 दिवसांचा वेळ होता. त्यामुळे जर पहिल्या प्रयत्नात भारतात जाताना लष्कराच्या जवानांनी तिला पकडलं असतं, तर तिने सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन पुन्हा एकदा दुसऱ्या बसने भारतात जाण्याचा प्रयत्न केला असता. मात्र हा प्लॅन बी वापरण्याची वेळ आलीच नाही. कारण सीमाचा प्लॅन ए यशस्वी ठरला आणि पाकिस्तानातून दुबईमार्गे नेपाळ आणि नेपाळमधून ती सुखरूपरीत्या भारतात आली. प्रेमाखातर केले सात समुद्र पार! सीमाचीच नाही ‘यांची’ही लव्हस्टोरी आहे एकदम खास सीमा यापूर्वी 10 मार्चला केवळ 7 दिवसांचा ट्युरिस्ट व्हिसा घेऊन नेपाळला गेली होती. तेव्हा सचिनसोबत तिची पहिली प्रत्यक्ष भेट झाली. दोघं नेपाळमध्ये फिरत असत. तिथून शेवटच्या दिवशी ती दुबईवरून पाकिस्तानला गेली होती. दरम्यान, या सगळ्या प्रवासाचा खर्च फार झाला असणार. मग सीमाला नेमका कोणाचा आर्थिक पाठिंबा होता, याचा शोध तपास यंत्रणांकडून सुरू आहे.