जन्मतःच आलेलं हे अपंगत्व स्वीकारून तिने आपलं नशीब स्वतःच लिहायचं ठरवलंय.
जुगल कलाल, प्रतिनिधी डुंगरपूर, 12 जून : सर्वकाही असूनही काहीना काही कमी पडतंच, हे आपण सर्रास अनुभवतो. खरंतर अनेकजण माझ्याजवळ हे नाहीये, माझ्याजवळ ते नाहीये असं म्हणत नशिबाला कोसताना दिसतात. परंतु समाजात असेही लोक असतात जे स्वतःजवळ खरोखर काही नसतानाही खूप काही मिळवण्यासाठी स्वतःच सक्षम होताच. राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यातील सविता हडातही त्यापैकीच एक. या 25 वर्षीय तरुणीच्या हातापायांना 5 नाही तर केवळ 2-2 बोटं आहेत. शिवाय पायाने तिला चालतही येत नाही. हाताची दोन बोटं जमिनीला टेकवत टेकवत ती पुढे सरकते. परंतु असं असलं तरी तिने आयुष्यात मात्र अजिबात हार मानलेली नाही. तर, जन्मतःच आलेलं हे अपंगत्व स्वीकारून तिने आपलं नशीब स्वतःच लिहायचं ठरवलंय. डुंगरपूरच्या सीमलवाडा ब्लॉकमधील चिखली गावात राहणारी सविता ही आपल्या पाच बहिणींमध्ये सर्वात मोठी. अपंगत्वामुळे आज 25 वर्ष तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र आव्हानांमुळे न थांबता त्यांना तोंड देऊन तिने स्वावलंबी बनायला सुरुवात केली. आपल्या 4 लहान बहिणींच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी तिला आपल्या खांद्यावर घ्यायची आहे. त्यांना चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी तिला मेहनत करायची आहे. आपल्या बहिणींना मोठमोठ्या अधिकारी पदावर पोहोचवावं असं तिचं स्वप्न आहे. त्यासाठी ती आता चक्क शिवणकाम शिकलीये. केवळ दोन बोटांनी ती शिवणकाम करते. दरम्यान, सविताचे वडील हकमा आणि आई गौतमी मजुरीचे काम करतात.
सविताच्या कुटुंबियांनाही तिच्या या धाडसाचं प्रचंड कौतुक आहे. सविता म्हणते, ‘आयुष्यात जे मिळालंय ते स्वीकारून पुढे जायचं असतं. मलासुद्धा माझ्या लहान बहिणींसोबत खेळायचंय, त्यांची काळजी घायचीये आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांच्यासोबत घालवायचा आहे.’ जगभरातील महासागरांमध्ये तरंगतय 20 मिलियन टन सोनं; शास्त्रज्ञांचा दावा, किंमत जाणून विस्फारतील डोळे महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शिवणकाम कोण शिकवणार, कसं शिकवणार, असे मोठे प्रश्न सवितासमोर उभे होते. त्याचवेळी तिने आपणो संस्थानच्या अशोक गेमती यांच्याशी चर्चा केली. ते तिला संस्थेत घेऊन गेले आणि तिच्या हातात थेट शिलाई मशीनच दिली. आता सविताचं शिवणकामाचं प्रशिक्षण पूर्ण झालं असून लवकरच ती काम सुरू करण्याच्या तयारीत आहे. शिलाईच्या पैशांमधून तिला आपल्या बहिणींना चांगलं आयुष्य द्यायचं आहे.