वॉशिंग्टन 12 जून : सोनं हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सोन्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच जगभरातील महासागरांमध्ये सोन्याचा मोठा साठा असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यानंतर महासागरांमधून सोनं काढणं शक्य आहे की नाही, याबद्दलच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. खरं तर पृथ्वीवरील महासागरांमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा आहे. याबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय. महासागरांमधील सोन्याची किंमत एक क्वाड्रिलियन डॉलर्सपेक्षाही जास्त असू शकते. पण सोन्याच्या शोधात समुद्रकिनाऱ्यावर जाणं तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतं, कारण ते मिळवणं इतकं सोपं नाही. शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे की अटलांटिक आणि उत्तर पॅसिफिकमध्ये प्रत्येक 100 दशलक्ष मेट्रिक टन समुद्राच्या पाण्यात सुमारे एक ग्रॅम सोनं विरघळलेलं आहे. जगाच्या इतर भागांमध्ये जसं की भूमध्य समुद्रात सोन्याचं प्रमाण थोडं जास्त असू शकतं. इतक्या जास्त पाण्यात फक्त एक ग्रॅम सोनं हे प्रमाण लहान वाटू शकतं, परंतु आपण थोड्या मोठ्या चित्राकडे पाहूयात. एनओएएच्या जुन्या अंदाजानुसार पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्यात सुमारे 20 मिलियन टन सोनं आहे. सोन्याची किंमत सतत बदलत राहते, पण आयएफएल सायन्स वेबसाइटनुसार, मे 2023 च्या अंदाजानुसार 1 टन सोन्याची किंमत 5,70,00,000 डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते. Gold News: स्वातंत्र्यापासून सोन्याने दिलंय 68 हजार टक्के रिटर्न! पाहा सर्वात जास्त कधी अन् कितीने वाढल्या किंमती समुद्रात किती सोनं आहे? हे मूल्यांकन बरोबर आहे, असं मानलं तर आज जगातील महासागरांमध्ये सोन्याची किंमत 1.14 क्वाड्रिलियन म्हणजेच 1,14,00,00,00,00,00,000 डॉलर्सपेक्षा जास्त असेल. त्याचे रुपांतर रुपयात केले तर हा आकडा आणखी मोठा होईल. हे सगळं रंजक वाटत असलं तरी हे सोनं मिळवणं मात्र खूप कठीण आहे. समुद्रातून सोनं काढण्याची प्रक्रिया अतिशय कठीण आहेच, पण समुद्रातून सोनं काढण्याचा स्वस्तातला मार्गही आपल्याकडे नाही. सोन्यापेक्षा ते काढण्याची प्रक्रिया पाचपट महाग प्रक्रिया महाग असली तरी आपण या दिशेने प्रयत्न करणं थांबवायला नको. नेचर जर्नलमध्ये प्रकाशित 1941 च्या अभ्यासात समुद्राच्या पाण्यामधून सोनं काढण्यासाठी ‘इलेक्ट्रोकेमिकल पद्धती’चे वर्णन केले आहे. परंतु या प्रक्रियेची किंमत मिळवलेल्या सोन्याच्या किंमतीपेक्षा पाचपट जास्त होती. जगातील समुद्राच्या पाण्यात सोनं शोधणं माणसाच्या आवाक्याबाहेरचं आहे. तसंच असं केल्याने काय परिणाम होतील, याचीही कल्पना नाही. पण सागरी पर्यावरणासाठी हे नक्कीच योग्य नसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.