नवी दिल्ली, 23 मे : भारतीय रेल्वेने (Indian Railway) राजधानी स्पेशल गाडीच्या रिझर्व्हेशन पद्धतीमध्ये बदल केला आहे. या गाड्यांसाठी अॅडव्हान्स रिझर्व्हेशन पीरियड (ARP) 7 दिवसांवरून 30 दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेकडून 15 राजधानी एक्सप्रेस स्पेशल ट्रेन चालवत आहे. आता या गाड्यांसाठी तात्काळ बुकिंग सेवा उपलब्ध नाही आहे. या गाड्यांमध्ये RAC आणि वेटिंग लिस्ट सुद्धा जारी करण्यात येईल. मात्र वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्यांना प्रवास करता येणार नाही. 4 तास आधी प्रवाशांचा पहिला चार्ट जारी केला जाईल तर दुसरा चार्ट दोन तास आधी जारी केला जाईल. भारतीय रेल्वेने 1 जून 2020 पासून सुरू होणाऱ्या विशेष ट्रेनसाठी बुकिंग सुरू केले आहे. 200 विशेष रेल्वे गाड्यांसाठी ऑनलाइन बुकिंग सुरू रेल्वेने आयआरसीटीसी (IRCTC)ची वेबसाइट आणि मोबाइल अॅपवरून बुकिंग करण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. त्यानंतर रेल्वेने पीआरएस काऊंटर्स, डाकघरं आणि आयआरसीटीसी एजेंट्सच्या माध्यमातून तिकीट बुक करता येईल अशी घोषणा केली आहे. (हे वाचा- 1 जूनपासून सुटणाऱ्या 200 स्पेशल गाड्यांसाठी रेल्वेने बनवले नियम ) तिकीट बुक करण्यासाठी शुक्रवारी देशभरात अनेक ठिकाणी पीआरएस काऊंटर उघडण्यात आले आहेत. रेल्वेने कोरोना व्हायरस (Coronavirus) चे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात 25 मार्चपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान पॅसेंजर, मेल आणि एक्सप्रेस सेवा बंद ठेवल्या होत्या. एसी ट्रेनदेखील सुरू संपूर्ण देशात आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सुरुवातीला केवळ पार्सल आणि मालगाड्या धावत होत्या. त्यानंतर रेल्वेने अडकलेल्य मजुरांसाठी, भाविक, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी 1 मेपासून श्रमिक स्पेशल ट्रेन्स सुरू केल्या. तर 12 मे पासून रेल्वेने 15 वातानुकूलित गाड्या देखील सोडल्या. (हे वाचा- विमान प्रवास केल्यानंतर राहावं लागणार 14 दिवस क्वारंटाइन? सरकारने दिलं हे उत्तर )