नवी दिल्ली, 23 मे : भारतीय रेल्वे 1 जून 2020 पासून 200 पॅसेंजर ट्रेन्स सुरू करणार आहे. IRCTC चे वेबसाइट आणि त्यांच्या अधिकृत अॅपवर या गाड्यांसाठी 21 मेपासून तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. याआधीपासून धावणाऱ्या श्रमिक रेल्वे आणि 30 स्पेशल एसी गाड्यांव्यतिक्त 200 गाड्या 1 जूनपासून धावणार आहेत. या गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत आणि यामध्ये एसी व नॉन एसी असे दोन्ही क्लास असणार आहेत. जनरल कोचमध्ये बसण्याकरता देखील आरक्षण करणे आवश्यक असणार आहे. कोणताही अनारक्षित कोच या गाड्यांमध्ये असणार नाही. आता प्रश्न असा आहे की रेल्वेकडून या गाड्यांमध्ये जेवण, बेडशीट आणि पांघरूण या सुविधा देण्यात येणार आहेत की नाही? केटरिंग संदर्भात हे नियम -तिकीट भाड्यामध्ये केटरिंग शूल्क नाही. तसच प्रीपेड मील बुकिंग आणि ई-बुकिंगवर निर्बंध घालण्यात आले आहेत. (हे वाचा- विमान प्रवास केल्यानंतर राहावं लागणार 14 दिवस क्वारंटाइन? सरकारने दिलं हे उत्तर ) -IRCTC कडून खाद्यपदार्थ आणि सीलबंद पाणी काही गाड्यांमध्येच देण्यात येईल ज्यामध्ये पँट्री कार जोडण्यात आली असेल. तिकीट बुक करताना प्रवाशांना यासंदर्भात सूचना देण्यात येईल. -सर्व प्रवाशांना त्यांच्याबरोबर जेवण आणि पाणी आणण्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. -फूड प्लाझा आणि रेफ्रिशमेंट रूम दिल्या जाऊ शकतात. ज्याठिकाणी खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्यासाठी परवानगी मिळेल, बसून खाण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही ट्रेनमध्ये मिळणाऱ्या पांघरूण, चादर संदर्भात हे नियम -स्पेशल ट्रेन्समध्ये पडदे किंवा चादर उपलब्ध करून दिली जाणार नाही. भारतीय रेल्वेने प्रवाशांना स्वत:चे सामान आणण्यस सांगितले आहे. (हे वाचा- लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 19100 कोटी रुपये ) -रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोचमधील तापमान रेग्यूलेट करण्यात येईल -रेल्वेने सर्व प्रवाशांना कमीत कमी सामान घेऊन प्रवास करण्यास सांगितले आहे संपादन - जान्हवी भाटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







