विमान प्रवास केल्यानंतर राहावं लागणार 14 दिवस क्वारंटाइन? सरकारने दिलं हे उत्तर

विमान प्रवास केल्यानंतर राहावं लागणार 14 दिवस क्वारंटाइन? सरकारने दिलं हे उत्तर

25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू होत आहेत. विमान प्रवासाबाबत एक प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. तो म्हणजे हा प्रवास केल्यानंतर 14 दिवसा क्वारंटाइन राहावं लागेल का?

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मे : सोमवारी 25 मे पासून देशांतर्गत विमान सेवा (Domestic Air Flight Service) सुरू होणार आहे. देशातील विमानतळं आणि विमान कंपन्यांनी उड्डाणासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. त्याचप्रमाणे आता तिकीट बुकिंग देखील सुरू झाली आहे. मात्र विमान प्रवासाबाबत एक प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. तो म्हणजे हा प्रवास केल्यानंतर 14 दिवसा क्वारंटाइन राहावं लागेल का?

लाइव्ह मिंट ने दिलेल्या बातमीनुसार नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी (Aviation Minister Hardeep Singh Puri) यांनी स्पष्ट सांगितले आहे की विमान प्रवास केल्यानंतर 14 दिवस क्वारंटाइन राहण्याची आवश्यकता नाही. ते म्हणाले की क्वारंटाइनच्या मुद्द्याला व्यावहारिक पद्धतीने पूर्ण करायला हवे. चाचणीमध्ये कुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला प्रवास करून दिला जाणार नाही.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले 19100 कोटी रुपये)

त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला प्रवास करण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे विमानप्रवास करण्यासाठी 2 तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवाशाला आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे अनिवार्य आहे. स्टेटस ग्रीन असणे देखील आवश्यक आहे.

एएआयने (Airports Authority of India) दिलेल्या माहितीनुसार विमानतळ संचालकांना प्रवासी टर्मिनलमध्ये येण्याआधीपासूनच योग्य प्रबंध आखणे गरजेचे आहे. तसच प्रवाशांनी विमानतळामध्ये जाण्याआधी थर्मल स्क्रिनिंग आवश्यक आहे. विमानतळाच्या संचालकांना प्रवाशांच्या सामानाच्या सॅनिटायझेशनसाठी देखील व्यवस्था करावी लागेल. AAI देशभरातील 100 हून अधिक विमानतळांचे व्यवस्थापन पाहते. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या मोठ्या विमानतळांचे व्यवस्थापन खाजगी कंपन्या पाहतात.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये सुरू करू शकता हा व्यवसाय, होईल लाखो रुपयांची कमाई)

विमान उड्डाण सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांसाठी  प्रवासभाडे निश्चित करण्यात आले आहे. जेणेकरून विमान कंपन्या त्यांची मनमानी करणार नाहीत. दिल्ली, मुंबईहून 90 ते 120 मिनिटांच्या फ्लाइटचे प्रवासभाडे कमीत कमी 3,500 ते जास्तीत जास्त 10,000 असेल. 24 ऑगस्टपर्यंत हेच प्रवासभाडे असणार आहे.

First published: May 23, 2020, 12:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading