JOIN US
मराठी बातम्या / देश / Odisha train accident : थरकाप उडवणारी दृश्ये! स्टीलच्या बोगीतून आरपार गेले रुळाचे लोखंड, पाहा ग्राउंड रिपोर्ट

Odisha train accident : थरकाप उडवणारी दृश्ये! स्टीलच्या बोगीतून आरपार गेले रुळाचे लोखंड, पाहा ग्राउंड रिपोर्ट

हा अपघात किती भयंकर आहे याची कल्पना हा व्हिडीओ पाहून येईल. ट्रेनच्या डब्यातील स्थिती अत्यंत विदारक आहे. रुळ बोगीचं स्टील तोडून आत घुसले आहेत.

जाहिरात

ट्रेनमध्ये घुसले रुळ! पाहा VIDEO

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भुवनेश्वर : कोरोमंडल रेल्वे एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भयंकर आहे की विचारही करू शकत नाही. गेल्या 12 वर्षांतला हा सर्वात भीषण हृदयद्रावक अपघात आहे. हा अपघात ओडिसामधील बालासोरा इथे झाला आहे. या अपघाताची ड्रोन दृश्यं तर अंगावर काटा आणणारी आहेत. या अपघातात 280 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. त्यांना आजूबाजूच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. काल रात्रीपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. रेल्वेमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. न्यूज18 च्या हाती घटनास्थळावरील एक्स्लुझिव्ह व्हिडीओ आला आहे.

Coromandel Train Accident : 5 मिनिटात 2 अपघात, तीन ट्रेन कशा धडकल्या? वाचा काय घडलं

हा अपघात किती भयंकर आहे याची कल्पना हा व्हिडीओ पाहून येईल. ट्रेनच्या डब्यातील स्थिती अत्यंत विदारक आहे. रुळ बोगीचं स्टील तोडून आत घुसले आहेत. बर्थची अत्यंत बिकट स्थिती आहे. ट्रेनचे डबे एकमेकांवर आदळल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे काही डब्यांचा चुराडा झाला.

Train Accident : कोरोमंडल ट्रेन अपघाताचा पहिला ड्रोन VIDEO, पाहून अंगावर येईल काटा

रेल्वेच्या ट्रेनचा बेस खूप मजबूत तयार केलेला असतो. हजारो प्रवाशांचा भार अगदी सहज उचलता येईल असा हा बेस तयार करण्यात आलेला असतो. शुक्रवारी रात्री जो अपघात झाला यात रेल्वेच्या डब्याचा खालचा भाग पूर्णपणे तुटून आतामध्ये रुळ घुसले आहेत. यावरून किती अपघात भयंकर असेल याची कल्पना करता येईल. रेल्वे ट्रकसमोर छिन्नविछिन्न मृतदेहांचा खच अन् तो वाजणारा मोबाइल; कोरोमंडल अपघाताचे अस्वस्थ करणारं वास्तव याशिवाय कोच आणि आतल्या बाजूला मृतदेह असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पूर्ण कोच उचलल्यानंतरच पूर्ण परिस्थिती समजेल अशी प्रतिक्रिया रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे. याचं राजकारण करु नये, प्रवाशांना रेस्क्यू करणं ही प्राथमिकता असून अपघात कसा झाला याची चौकशी केली जाणार आहे. असंही त्यांनी सांगितलं.

किंग ऑफ साऊथ इस्टर्न रेल्वे, वर्षभर असते फुल्ल; का पडलं कोरोमंडल नाव?

24 टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून सलग रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. संध्याकाळपर्यंत हे पूर्ण होईल अशी आशा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील घटनास्थळाची पाहणी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या