JOIN US
मराठी बातम्या / देश / सीमा हैदरच्या घरी रात्री अचानक आले पोलीस! का लागला दरवाजा उघडायला वेळ?

सीमा हैदरच्या घरी रात्री अचानक आले पोलीस! का लागला दरवाजा उघडायला वेळ?

आपल्या चार मुलांना घेऊन घर सोडून आलेल्या या पाकिस्तानी महिलेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असू शकते का? अशी शंकाही व्यक्त केली जातेय.

जाहिरात

सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असू शकते का? अशी शंकाही व्यक्त केली जातेय.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नोएडा, 17 जुलै : सचिनसाठी पाकिस्तान सोडून भारतात आलेली सीमा हैदर सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. आपल्या चार मुलांना घेऊन घर सोडून आलेल्या या पाकिस्तानी महिलेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असू शकते का? अशी शंकाही व्यक्त केली जातेय. त्यामुळे पोलीस सीमाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. रविवारी रात्री नोएडा पोलीस अचानक रबूपुरा गावात दाखल झाले. गावात पोलिसांना पाहून गावकरीही हादरले. पोलिसांनी सीमा-सचिनच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र…

पोलीस दारात उभे असताना सचिनचे कुटुंबीय दरवाजा उघडत नव्हते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पोलीस सचिनच्या घरात गेले. जवळपास 1 तास त्यांनी सचिन आणि सीमाची चौकशी केली. अटकेच्या वेळी दिलेल्या माहितीवर सीमा ठाम आहे का, याचा तपास पोलिसांना करायचा होता, अशी माहिती मिळाली. मात्र त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकलं नाही. शिवाय पोलीस घराबाहेर येताच सचिनच्या कुटुंबीयांनी दरवाजा बंद केला. सीमाला माध्यमांसमोर येऊ दिलं नाही. SDM की जिल्हा कमांडंट होमगार्ड, कोण आहे भारी? जास्त POWER कोणाकडे? दरम्यान, एका ऑनलाईन खेळातून ओळख होते, प्रेम होतं. या प्रेमातून एक पाकिस्तानी महिला आपल्या चार मुलांना घेऊन भारतात येते. तेही शारजाहमार्गे नेपाळ आणि नंतर भारत गाठते, हे अतिशय संशयास्पद असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. हे खरंच प्रेम आहे की आणखी काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या