लखनऊ, 11 जुलै : एसडीएम ज्योती मौर्य आणि त्यांचे पती आलोक मौर्य यांचा वाद काही शमण्याचं नाव घेत नाहीये. उलट या वादाचा भडका दिवसेंदिवस आणखी गडद होतोय. या दोघांसह मनीष दुबेचीही चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. उत्तर प्रदेशातील या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. याबाबत दररोज नवे आरोप-प्रत्यारोपही समोर येत आहेत. ज्योती मौर्य या एसडीएम आहेत, तर त्यांचा कथित प्रियकर मनीष दुबे हा जिल्हा कमांडंट होमगार्ड आहे. त्यामुळे आता या पदांबाबतही लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या दोन्हींपैकी नेमकं कोणतं पद आहे जास्त भारी? असा प्रश्न लोकांना पडला आहे. त्यामुळे आज आपण याबाबत माहिती पाहूया.
उत्तर प्रदेशातील एसडीएम म्हणजेच उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हा कमांडंट होमगार्ड ही दोन्ही पदं पीसीएस परीक्षेद्वारे भरली जातात. परंतु तरीही दोघांमध्ये एसडीएम हे पद सर्वाधिक शक्तिशाली आहे. एखाद्या जिल्ह्यातील डीएम म्हणजेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांनंतर एसडीम हे सर्वात मोठं पद मानलं जातं. एसडीएम पदासाठी यूपीपीएससी परीक्षेत पहिल्या 20 उमेदवारांमध्ये स्थान मिळवणं आवश्यक असतं. तर जिल्हा कमांडंट होमगार्ड किंवा डीएसपी पदासाठी 20 ते 70 उमेदवारांमध्ये येणं गरजेचं असतं. Amol Kolhe : बंडखोरीनंतर शरद पवारांचा मोठा डाव; अमोल कोल्हेंना मिळालं निष्ठेचं फळ; पक्षात मोठी जबाबदारी एसडीएम होण्यासाठी उत्तर प्रदेश राज्याच्या पीसीएस या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागतं. त्यासाठी प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन फेऱ्या पार पडतात, ज्यांचं स्वरूप अतिशय अवघड असतं. तर, जिल्हा कमांडंट होमगार्ड होण्यासाठी या तीन टप्प्यांसह शारीरिक कार्यक्षमता चाचणीतही उत्तीर्ण व्हावं लागतं.