नवी दिल्ली, 24 जून: राज्यसभेत 2020 वर्षात नव्याने आलेल्या 62 खासदारांपैकी 16 खासदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. निवडून आलेल्या खासदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार, या खासदारांविरुद्ध कोर्टात गंभीर गुन्हेगारीचे खटले प्रलंबित आहेत. त्यात खून, बलात्कार, खून करण्याचा प्रयत्न आणि दरोडा सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीतील असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने विश्लेषणाद्वारे ही माहिती समोर आली आहे. हेही वाचा… नशा शराब में होता तो नाचती बोतल! उपकेंद्रात रंगलेल्या ओली पार्टीचा VIDEO व्हायरल एका खासदाराविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन खासदारांनी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचा उल्लेख केला आहे. यापैकी 3 खासदारांनी महिलांवरील गुन्हेगारीसंबंधित खटल्यांबाबत प्रतिज्ञापत्र दिले आहे. तर एका खासदाराने बलात्काराच्या घटनेची माहिती दिली आहे. भाजपचे 18 खासदारांपैकी २, कॉंग्रेसचे 9 पैकी 3 खासदार, राष्ट्रवादीचे दोन्ही खासदार, वायएसआयआरचे 4 पैकी 2 आणि बीजेडीके 25 टक्के, तृणमूल कॉंग्रेसचे 25 टक्के, जेडीयूचे 50 टक्के, द्रमुकचे 33 टक्के, आरजेडीचे 50 टक्के खासदार आहेत. मध्य प्रदेशातील 3 पैकी 1 खासदार, राजस्थानातील एक आणि झारखंडमधील 2 खासदारांनी त्यांच्या गुन्हेगारी नोंदी उघड केल्या आहेत. याशिवाय या नव्याने खासदारांपैकी 84 टक्के म्हणजेच 52 खासदार कोट्यधिश आहेत. त्यात वायएसआर कॉंग्रेसचे अलायोध्याराम रेड्डी सर्वात धनाढ्य खासदार आहेत. त्यांची मालमत्ता 25,7775,79,180 रुपये एवढी आहे. नथवाणी परिमल हे त्याच पक्षाचे सर्वात श्रीमंत खासदार आहेत. त्यांची मालमत्ता 3,9 683,9 6,1 9 8 रुपये एवढी आहे. हेही वाचा… राहुल गांधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, चीनसोबतच्या ‘त्या’ करारावर केला सवाल तिसर्या क्रमांकावर कॉंग्रेसकडून भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांची मालमत्ता 3,790329,144 रुपये एवढी आहे. भाजपच्या महाराजा संजोबा लीसेम्बाकडे सर्वात कमी 5,48,594 रुपये एवढी मालमत्ता आहे. याच अनुक्रमे, भाजपचे अशोक गस्ती ही त्यांची 19,40,048 रुपयांची मालमत्ता आहे. तर तृणमूल कॉंग्रेसच्या अर्पिता घोष तिसर्या क्रमांकावर आहेत.