Home /News /national /

राहुल गांधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; चीनसोबतच्या ‘त्या’ करारावर केला सवाल

राहुल गांधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; चीनसोबतच्या ‘त्या’ करारावर केला सवाल

राहुल गांधींबरोबरच सोनिया गांधी आणि काँग्रेसविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे

    नवी दिल्ली, 24 जून : चीनविरोधात सुरू असलेल्या तणावादरम्यान काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एका वकिलांच्या वतीने दाखल केलेल्या या याचिकेत 2008 मध्ये यूपीए सरकार आणि चिनी सरकार यांच्यात झालेल्या करारासंदर्भात माहिती मागविण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) आदेश किंवा सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे. हे वाचा-गेल्या 4-5 दिवसांत चीनकडून 40300 सायबर हल्ले; सायबर विभागाकडून नियमावली जारी या याचिकेत 2008 मध्ये चीन आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीन यांच्यात झालेल्या कराराची माहिती मागितली आहे. या करारामध्ये दोघांमधील उच्चस्तरीय माहितीची देवाणघेवाण आणि सहभागाचा समावेश आहे. हे वाचा-मोठा खुलासाः गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर हल्ला करण्याचा चीननेच दिला होता आदेश दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्वपक्षीय बैठकीत चीनसोबतच्या वादावर (India china border dispute) जे वक्तव्य दिलं होतं त्यामुळे लष्कराला (Indian army) मोठा धक्का बसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत त्यांनी हा आरोप केला. चीनने भारतीय भूमीवर कब्जा केलेला नाही आणि कुठली पोस्टही घेतलेली नाही असं वक्तव्य मोदींनी केलं होतं. राहुल गांधी म्हणाले, चीनने निर्लज्जपणे भारताच्या भूमिवर ताबा मिळवलेला आहे. पंतप्रधांनांच्या या वक्तव्यामुळे अतिशय गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
    First published:

    Tags: Rahul Gandhi (Politician), Sonia gandhi

    पुढील बातम्या