मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नशा शराब में होता तो नाचती बोतल! उपकेंद्रात रंगलेल्या ओली पार्टीचा VIDEO व्हायरल

नशा शराब में होता तो नाचती बोतल! उपकेंद्रात रंगलेल्या ओली पार्टीचा VIDEO व्हायरल

सिंदखेड राजा तालुक्यातील महावितरण कंपनीच्या काही उपअभियंत्यांनी लॉकडाऊनच्या काळात ओल्या पार्टी केल्याचं समोर आलं आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील महावितरण कंपनीच्या काही उपअभियंत्यांनी लॉकडाऊनच्या काळात ओल्या पार्टी केल्याचं समोर आलं आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील महावितरण कंपनीच्या काही उपअभियंत्यांनी लॉकडाऊनच्या काळात ओल्या पार्टी केल्याचं समोर आलं आहे.

  बुलडाणा, 24 जून: सिंदखेड राजा तालुक्यातील महावितरण कंपनीच्या काही उपअभियंत्यांनी लॉकडाऊनच्या काळात ओल्या पार्टी केल्याचं समोर आलं आहे. एका अभियंत्याच्या वाढदिवसानिमित्त या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. महावितरणचे उपअभियंता विलास पापुलवार यांचा दारू पिऊन 'नशा शराब में होता तो नाचती बोतल!', या गाण्यावर नाचतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

  हेही वाचा...भयंकर! शेजारील महिला घ्यायच्या चारित्र्यावर संशय, पुण्यात विवाहितेची आत्महत्या

  सिंदखेड राजा येथील 33/11 के.व्ही उपकेंद्रावर काल (23 जून) सायंकाळी मद्यपार्टी झाली. उपअभियंता विलास पापुलवार यांनी अधिकाराचा दुरउपयोग केला आहे. या मद्यपार्टीचा व्हिडिओ चव्हाट्यावर आला आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने विज वितरण कंपनीच्या कार्यालयात समोर निषेध आंदोलन केलं. या बेजबाबदार उपअभियंत्याला तडकाफडकी बडतर्फ करा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी केली आहे.

  दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यात गेल्या महिन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी विजेचे पोल पडले आहेत. शेतात तारा पडलेल्या आहेत. अनेक 33 के.व्ही. उपकेंद्रात साहित्य नाही. तालुक्यातील अनेक फिडर बंद आहेत. घरगुती, व्यावसायिक कामासाठी वीज जोडणी करण्यासाठी अर्ज दाखल करुनही वर्षभर वीज जोडणी केली जात नाही. कृषी पंपावर वीज पुरवठा करणारे शेकडो रोहीत्र नादुरुस्त आहेत. या सर्व तक्रारीच्या अर्जाचा ढीग तालुका कार्यालयात पडलेला असताना एकाही कामाचा निपटारा झालेला नाही.

  हेही वाचा... कोण गोपीचंद पडळकर, त्याची औकात काय? जितेंद्र आव्हाड संतापले, दिला सज्जड इशारा

  त्यात एप्रिल आणि मे अशी तब्बल एक महिन्याची आजारी सुट्टी घेऊन उपअभियंता विलास एल पापुलवार यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरलं आहे. त्यानंतर कामावर रुजू झाल्यापासून कामाचा निपटारा न करता कनिष्ठ अभियंता, लाईनमन, हेल्पर यांना हॉट्सअॅपवर मेसेज टाकून विक्षिप्त वर्तवणूक करणे. एवढंच नाही तर माझ्या वाढदिवसाला केक, हार आणि रात्रीच्या पार्टीला अमूक टमूक घेऊन मस्त एन्जॉय करा, असाही मॅसेज या जबाबदार अधिकाऱ्याने टाकून महावितरण कंपनीची नामुष्की केली आहे. अशा बेजबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

  First published:
  top videos

   Tags: Buldana, Maharashtra news, Mahavitaran engineer, Vidarbha