याबाबत कोणालाही किळस वाटत नाही, कारण लोक अतिशय भक्तिभावाने या जत्रेत सहभागी होतात.
रितेश कुमार, प्रतिनिधी समस्तीपूर, 8 जुलै : तुम्हाला जत्रेत जायला आवडतं? किती छान छान खेळणी असतात ना तिथे. वेगवेगळे खेळसुद्धा खेळता येतात. रोजच्या बाजारात ज्या वस्तू मिळत नाहीत, त्या सगळ्या जत्रेत मिळतात. माणसांची जत्रा भरते, तशी कधी सापांची जत्रा भरली तर? शी…हा विचारच किती किळसवाणा आहे. परंतु बिहारमध्ये अशी खरीखुरी जत्रा भरते, तीसुद्धा प्लॅस्टिकच्या सापांची नाही, तर खऱ्या विषारी सापांची. शिवाय त्याबाबत कोणालाही किळस वाटत नाही, कारण लोक अतिशय भक्तिभावाने या जत्रेत सहभागी होतात.
आपल्या महाराष्ट्रात यंदा श्रावण 18 जुलैला सुरू होईल. तर, उत्तर भारतात 4 जुलैपासून श्रावणाची सुरुवात झाली आहे. श्रावण हा महादेवाला समर्पित असतो आणि साप म्हणजे महादेवाचा अत्यंत प्रिय दागिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यात सापाची विशेष पूजा केली जाते. अलीकडेच बिहारमध्ये श्रावणातला नागपंचमी सण पार पडला. या सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे सापांच्या जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात हजारोंच्या संख्येने लोक हजारो विषारी साप हातात, गळ्यात गुंडाळून उत्सव साजरा करताना दिसले. या जत्रेत सहभागी होण्यासाठी भाविक दूरदूरहून आले होते. बिहारच्या विविध गावांमध्ये हा सोहळा पार पडला. उत्तर भारतात श्रावण प्रचंड श्रद्धेने पाळला जातो. श्रावणात येणारे सर्व सण-उत्सव आनंदाने साजरे केले जातात. नागपंचमीच्या दिवशी लोक एकत्र जमून नदीकिनारी विधिवत पूजा करतात. मग एक एक करून नदीत डुबकी मारतात. पाण्यातून अंगावर येतील तेवढे साप घेऊन ते नदीतून बाहेर पडतात आणि मग जत्रेला सुरुवात होते. अशावेळी काहींच्या अंगावर अगदी डझनभर सापसुद्धा असतात. मात्र कोणीही अजिबात घाबरत नाही, साप झटकूनही देत नाही. शिवाय सापही त्यांच्या अंगा-खांद्यावर असे खेळत असतात की, जणू त्यांचे मित्रच आहेत. जत्रा पार पडल्यावर त्याच रात्री जागरण असतं. रात्रभर हे विषारी साप जवळ बाळगून पूजेनंतर सकाळी लोक पुन्हा नदीवर जातात. आंघोळ करून सापांना दुधाचा नैवेद्य दाखवतात. त्यानंतर सर्व सापांना सुखरूपरीत्या जंगलात सोडलं जातं. बागेमध्ये लोक फिरायला गेले अन् नाग आणि नागिणीचा सुरू होता रोमान्स, LIVE VIDEO दरम्यान, या जत्रेत सापांकडून लोकांना दंश होतो, असं कोणतंही वृत्त नाही. उलट वर्षानुवर्षे ही जत्रा मोठ्या उत्साहात पार पडते. लोक निडरपणे आतुरतेने तिची वाट पाहत असतात.