रिल्स बनवण्याच्या नादातही अनेकजण आपला जीव गमावतात, असं म्हटलं जात आहे.
अमित सिंह, प्रतिनिधी प्रयागराज, 15 जून : भारताला नद्यांचा देश म्हटलं जातं. भारतात लहान-मोठ्या मिळून एकूण 400 हून अधिक नद्या वाहतात. जगातील अनेक मोठ्या नद्या भारतात आहेत. परंतु सध्या नदीत बुडून जीव गमावणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढतेय. गेल्या महिनाभरात निष्काळजीपणामुळे बुडालेल्यांची आकडेवारी अतिशय भयावह आहे. मागील दीड महिन्यात गंगा-यमुना नदीत 30 हून अधिक जणांनी आपला जीव गमावला. फाफामऊ, संगम, नैनी, करछना, इत्यादी घाटांवर घडलेल्या या घटना आहेत. तीव्र उष्णता आणि सततचा घाम यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण नदीकिनारी घाटांवर येतात. शिवाय विद्यार्थीही मौजमजेसाठी येत असतात, मात्र कधीकधी त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही आणि खोलवर बुडून त्यांचा मृत्यू होतो. या अपघाती मृत्यूंमुळे घाट प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाकडून योग्य सुरक्षा व्यवस्था नाही, असं लोकांचं म्हणणं आहे. मात्र गंगा घाटावर पाण्यात ठिकठिकाणी धोक्याचे बॅनर लावलेले असतानाही उत्साहाच्याभरात तरुणमंडळी खोल पाण्याचा आनंद घ्यायला जातात आणि जीव गमावून बसतात. मागील बुधवारी बुडालेल्या चारजणांनी सुरक्षा व्यवस्थेने लावलेले धोक्याचे बॅरिकेड्स ओलांडले होते. तर, मोतीलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही इशारा फलक पार केला होता.
20 मे रोजी गुरुकुल माँटेसरी शाळेतील बारावीच्या दोन विद्यार्थ्यांचा फाफामऊ घाटात गंगेत बुडून मृत्यू झाला. तर, 22 मे रोजी सतना येथील दोन तरुणांचाही याठिकाणी असाच मृत्यू झाला होता. तसेच यापूर्वी शिवकुटी येथील कोटेश्वर महादेव घाटात विकास आणि दिपेंद्र या एमएनएनआयटीच्या विद्यार्थ्यांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. असे अनेक भीतीदायक आकडे समोर आले आहेत. Devendra Fadnavis : शिवसेनेच्या जाहिरातीमुळे नाराज आहात का? फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्टच सांगितलं दरम्यान, आजकाल घाटावर मोबाईलमध्ये फोटो काढणे, उंचावरून उडी घेतानाचे रिल्स बनवणे, असे कारनामे सुरू असतात. वास्तवाचं भान सोडून रिल्स बनवण्याच्या नादातही अनेकजण आपला जीव गमावतात, असं म्हटलं जात आहे.