JOIN US
मराठी बातम्या / देश / 'तो' कामासाठी आला होता; साळींदरामागे धावला आणि जीव गमावून बसला

'तो' कामासाठी आला होता; साळींदरामागे धावला आणि जीव गमावून बसला

नोकरीच्या शोधात गेलेला आपला मुलगा आता घरी कधीच परतणार नाही, या विचारानेच त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जाहिरात

साळींदर झपकन एका गुहेत शिरला, तर त्याच्यामागे त्यानेही गुहेत घुसण्याचा प्रयत्न केला.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राहुल सिंह, प्रतिनिधी बागेश्वर, 25 जून : ‘तो’ कामाच्या शोधात भारतात आला होता. तीन दिवसांपूर्वी साळींदराचा पाठलाग करत गुहेत शिरला आणि जीव गमावून बसला. नोकरीच्या शोधात गेलेला आपला मुलगा आता घरी कधीच परतणार नाही, या विचारानेच त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लेकराचा मृतदेह घेऊन ते नेपाळला रवाना झाले. 22 वर्षीय भरत बुडा हा नेपाळच्या दुलू भागातील रहिवासी होता. आपल्या मित्रांसह उत्तराखंडातील बागेश्वरच्या रीमा परिसरात तो चुनखडी उत्खननाचं काम करायचा. 15 जूननंतर खाणकाम बंद झालं. त्यानंतर तो आपल्या सहकाऱ्यांसह कामाच्या शोधात मेंपौडीबैंड चौगांवछीना भागात गेला. तिथे ते महादेव गुहेजवळ तंबू बांधून राहू लागले. जंगलात एकदा लाकडं गोळा करण्यासाठी गेलेला असताना भरतला साळींदर दिसला. त्याचं आकर्षक रूप पाहून तो त्याच्या मागे धावत सुटला. साळींदर झपकन एका गुहेत शिरला, तर त्याच्यामागे भरतनेही गुहेत घुसण्याचा प्रयत्न केला. सहकाऱ्यांनी त्याला गुहेत जाताना पाहिलं. बराच वेळ झाला मात्र भरत बाहेर काही आलाच नाही. तो बाहेर येत नाहीये, हाकेला ओ देत नाहीये म्हणून सहकारी प्रचंड घाबरले, त्यांना वेगळीच शंका आली.

अखेर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि भरतची बचाव मोहीम सुरू केली. मोठ्या शर्थीने त्यांनी भरतला बाहेर काढलं, मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. गुहेत श्वास कोंडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द केला. नवरा-बायकोचा मृतदेह आणि भवती 150 भुकेलेल्या मांजरी, त्याप्रकरणाने पोलिसही हादरले दरम्यान, साळींदर हा शांत स्वभावाचा प्राणी आहे. त्याच्या शरीराच्या वरील भागात बाणासारखे मजबूत, तीक्ष्ण काटे असतात. या काट्यांच्या सहाय्याने तो स्व:रक्षण करतो. ज्यावेळी त्याला मानव किंवा प्राण्यांपासून धोका वाटतो तेव्हा तो हे काटे शरीरातून काढून टाकतो, ज्यामुळे त्यांना दुखापत होते. शिवाय या काट्यांसाठी त्याची शिकारही केली जाते. कारण हे काटे काही तांत्रिक विधींमध्ये वापरले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या