JOIN US
मराठी बातम्या / देश / लॉकडाउनमध्ये रेल्वे बंद, पण IRCTC प्रवाशांच्या खिश्यातून केली बक्कळ कमाई!

लॉकडाउनमध्ये रेल्वे बंद, पण IRCTC प्रवाशांच्या खिश्यातून केली बक्कळ कमाई!

रेल्वेने 15 एप्रिलनंतर ऑनलाइन रेल्वे बुकिंगची सुविधा सुरू केली होती. तिकीट खिडकी उघडलेली पाहून अनेक प्रवाश्यांनी तिकीट बूक केली होती

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 एप्रिल :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. त्यामुळे रेल्वेची वाहतूकही रद्द करण्यात आली आहे. तसंच इतर प्रवाशी वाहतुकीलाही मनाई करण्यात आली.  या लॉकडाउनच्या काळात  किंवा ज्यांनी यापूर्वी ऑनलाइन रेल्वेची तिकिटे बूक केली होती ती सर्व रद्द  करण्यात आली आहे.  पण, यत आयआरसीटीसीने बक्कळ कमाई केली आहे. ज्यांनी ऑनलाइन रेल्वेची तिकीटं बूक केली होती. त्यांना ती रद्द केल्यास 10 ते 25  रुपयांची रक्कम भुर्दंड सहन करावा लागत आहे. मात्र, आयआरसीटीसीने चांगली कमाई केली आहे.  लॉकडाउन वाढल्यामुळे रेल्वे सेवेच्या प्रवाशांनी अनेक तिकीटं रद्द केली. सरकारच्या घोषणेनुसार, रेल्वेने 3 मे 2020 पर्यंत गाड्या रद्द केल्या आहेत, पण आयआरसीटीसी (इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) कडून तिकीट रद्द करणाऱ्या  प्रवाशांकडून दंड आकारला जात आहे. हेही वाचा -  निळे ओठ, पिवळं शरीर; चिमुकल्यांमध्ये कोरोनाची लक्षणं की नव्या व्हायरसचं संकट? रेल्वेने 15 एप्रिलनंतर ऑनलाईन रेल्वे बुकिंगची सुविधा सुरू केली होती. तिकीट खिडकी उघडलेली पाहून अनेक प्रवाश्यांनी तिकीट बूक केली. पहिल्या लॉकडाऊनमध्ये यातील बरेच लोक इतर शहरांमध्ये अडकले होते. दरम्यान, सरकारने लॉकडाउन  वाढवला. त्यामुळे रेल्वेनेही गाड्या रद्द केल्या. आयआरसीटीसीने आपल्या संकेतस्थळावर अशी माहिती दिली की, प्रवाशांना तिकीटं रद्द करायची नाहीत, त्यांना आपोआप पूर्ण भाडे मिळेल. त्यामुळे, प्रवाशांना संपूर्ण रक्कम मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, आरक्षणाची शुल्क वजा करून रुपये परत केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.  यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष आहे. ऑनलाइन तिकिटांमधून ही रक्कम वजा केल्याबद्दल तक्रार कोठे करावी, याचीही प्रवाशांना  चिंता आहे. आयआरसीटीसीचे अधिकारी म्हणतात की, गाड्या रद्द करण्याचा रेल्वेचा निर्णय आहे. संपूर्ण पैसे परतावा केवळ आरक्षण काऊंटर तिकिटांवर उपलब्ध आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने हा निर्णय घेतला नाही. **हेही वाचा -** पालघर हत्याकांड : जंगलात लपून बसले होते आरोपी, ड्रोनच्या मदतीने पकडले VIDEO रद्द झालेल्या तिकीटांवरील आरक्षण शुल्क वजा केल्यानंतर रक्कम परत केली जात आहे. यामुळे या संकटाच्या काळात  प्रवाशांना 10  ते 25  रुपयांचा फटका बसला आहे. तर आयआरसीटीसीने अशा या परिस्थितीत प्रवाशांच्या खिश्याला कात्री मारली आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या