पालघर, 30 एप्रिल : चोर समजून दोन साधू आणि चालकाची जमावाने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी 101 जणांना अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून अजूनही जंगलात लपून बसलेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. या कारवाईचा व्हिडिओ समोर आला आहे. तसंच, या प्रकरणातील आरोपींना डहाणू न्यायालयाने अन्य एका गुन्ह्यांमध्ये 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
16 एप्रिल रोजी गडचिंचले येथे घडलेल्या या हत्याकांडात दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कासा पोलिसांनी सुमारे 400 ते 500 आरोपींच्या विरुद्ध साधूंवर जीवे ठार मारण्याच्या हेतूने हल्ला केल्याच्या, साधूंचा खून केल्याचा दुसरा तर आरोपींचा शोध घेताना पोलिसांवर हल्ला करण्याच्या असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते.
या हत्याकांडात तिघांचा खून केल्या प्रकरणी कासा पोलिसांनी 101 आरोपींना अटक केली होती व त्यांची पोलीस कोठडी आज 30 एप्रिल रोजी संपत होती. या सर्व आरोपींना डहाणू न्यायालयात हजर केले असता त्यांना पहिल्या या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, मात्र, त्याचबरोबरीने न्यायालयाने साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्या करण्याच्या प्रयत्न करण्याचा अन्य गुन्ह्यामध्ये या सर्व 101 आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी पुन्हा पुरवण्यात आली आहे.
हेही वाचा - परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्य सरकारने अखेर उचलले पाऊल
या प्रकरणातील काही आरोपही जंगलात लपून बसले आहे. या पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. तसंच याप्रकरणी पोलीस इतर आरोपींचा शोध घेत असून काही मंडळींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत आहे.
संपादन - सचिन साळवे