केरळ, 11 एप्रिल : कोरोनाची भीती भारतात दिवसेंदिवस वाढत आहेत. जलद गतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत. याकरिता 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. 14 एप्रिलला हा लॉकडाउन संपणार आहे, मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, हा कालावधी आणखी वाढू शकतो. मात्र असे असले तरी, लोकं लॉकडाउन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळं यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत आहेत. अशाच लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्यांना पकडण्यासाठी केरळ पोलिसांनी हटके बंदोबस्त ठेवला आहे. त्यांनी अनेक ड्रोन तैनात केल्या आहेत. केरळ पोलिसांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लोक ड्रोन पाहिल्यानंतर सैरावैरा पळताना दिसत आहेत. वाचा- VIDEO : सावधान! ग्लोव्ह्जमुळेही पसरू शकतो कोरोना, नर्सनं सांगितलं कारण केरळ पोलिसांनी 2016मध्ये व्हायरल झालेल्या #TracerBulletChallange मध्ये भाग घेतला होता. यावेळी त्यांनी मजेदार कॉमेंट्रीसह व्हिडीओ शेअर केले होते. आता असाच व्हिडीओ त्यांनी पुन्हा शेअर केला आहे. यामध्ये ड्रोनला पाहून लोकं पळताना दिसत आहेत. एक व्यक्ती तर ड्रोन पाहून नारळाच्या झाडामागे लपलेले दिसत आहे. वाचा- आता घरबसल्या करा ट्रेकिंग! विश्वास नसेल बसत तर पाहा हा VIDEO
केरळच नाही तर इतर राज्यांमध्येही लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडणाऱ्यांना पकडण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. पोलीस 5 पेक्षा जास्त लोकं एका ठिकाणी जमलेल्यांवर कारवाई करत आहेत. वाचा- ‘मी कोरोना पॉझिटिव्ह, आता बघा कसा पसरवते’, तरुणीने VIDEOद्वारे दिली धमकी वाचा- लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या माणसाच्या मागे लागला गेंडा आणि… पाहा VIDEO