आता घरबसल्या करा ट्रेकिंग! विश्वास नसेल बसत तर पाहा हा VIDEO

घरातबसून काय करायचं असा विचार मनात येत असेल. तर हा VIDEO पाहा आणि करा ट्रेकिंगची तयारी.

घरातबसून काय करायचं असा विचार मनात येत असेल. तर हा VIDEO पाहा आणि करा ट्रेकिंगची तयारी.

  • Share this:
    नवी दिल्ली, 07 एप्रिल : कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सध्या सर्व देश एकजुटीने प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बऱ्याच देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं गेले कित्येक दिवस लोकं घरात कैद आहे. कोरोनाला हरवण्यासाठी लॉकडाउन गरजेचे आहे, त्यामुळं याला काही पर्याय नाही. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की घरात बसून तुम्ही ट्रेक करू शकता तर? विश्वास नाही बसत आहे? पण हे खरं आहे. फिलिप क्लेन या प्रसिद्ध युट्युबरने घरातबसूनही तुम्ही कसे फिरू शकता याच्या भन्नाट कल्पना दिल्या आहेत. त्याचा घरात ट्रेकिंग करतानाचा व्हिडीओ तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये क्लेन घरातच हिरव्या चादरीपासून डोंगर बनवून त्यावर चढत आहे, असे दाखवले आहे. एवढंच नाही तर तो स्कायकलिंग, स्कीइंगही करत आहे. वाचा-'मी कोरोना पॉझिटिव्ह, आता बघा कसा पसरवते', तरुणीने VIDEOद्वारे दिली धमकी वाचा-6 वर्षांच्या मुलानं मृत्यूला हरवलं, फुफ्फुसाच्या आजारानंतर आता कोरोनावर मात 57 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये क्लेन ट्रेकिंग करत आहे. लॉकडाउनमध्ये फावला वेळ कसा घालवायचा यासाठी क्लेन विविध आयडिया शोधत आहे. ट्रेकिंग आणि स्कीइंगचा व्हिडीओ क्लेनने स्लो मोशनमध्ये तयार केला आहे. 57 सेकंदाचा हा व्हिडीओ शूट करण्यासाठी त्याला संपूर्ण एक दिवस लागला. काही व्हिडीओमध्ये त्यानं आपल्या आई-वडीलांनाही घेतलं आहे. फिलिप क्लेन हा प्रसिद्ध युट्युबर असून, तो स्कीइंगचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. जगभरातील सर्व उंच डोगर-पर्वतांवर स्कीइंग करण्याचे फिलिपचे स्वप्न आहे. वाचा-माणसातला देव! घरच्यांनी साथ सोडली, तरी डॉक्टरांनी रुग्णाला हातांनी भरवलं जेवण वाचा-काळजात घर करेल असा PHOTO VIRAL, वाचा यामागची अंगावर शहारे आणणारी कहाणी क्लेनने हे सर्व व्हिडीओ लोकांना लॉकडाउनमध्ये घरा बाहेर पडू नये म्हणून केले आहेत. प्रत्येक व्हिडीओमध्ये क्लेन लोकांना घरी राहा, सुरक्षित राहा! असे संदेश देत आहे.
    First published: