लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या माणसाच्या मागे लागला गेंडा आणि... पाहा VIDEO

लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या माणसाच्या मागे लागला गेंडा आणि... पाहा VIDEO

कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) जगातील बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर लोकांपेक्षा प्राणी-पक्षी दिसू लागले आहेत. अगदी जंगली प्राणीसुद्धा रस्त्यावर दिसत आहेत.

  • Share this:

नेपाळ, 08 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) जगातील बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर लोकांपेक्षा प्राणी-पक्षी दिसू लागले आहेत. अगदी जंगली प्राणीसुद्धा रस्त्यावर दिसत आहेत. नोएडामध्ये बिबट्या, चंडीगडमध्ये नीलगाय तर मुंबईमध्ये चक्क रस्त्यावर मोर दिसले आहेत.  आता एक व्हिडीओ समोर येत आहे, ज्यामध्ये चक्क एक गेंडा रस्त्यावर फिरताना पाहायला मिळाला. हा व्हिडीओ नेपाळमधील असल्याचं समजतंय. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFF) अधिकारी प्रवीण कसवान यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. द डिप्लोमॅटच्या वृत्तानुसार, नेपाळमध्ये 24 मार्च रोजी एक आठवड्याच्या लॉकडाऊची घोषणा केली होती, ती आता 15 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक बाजारपेठा बंद आहेत.

(हे वाचा-'मी कोरोना पॉझिटिव्ह, आता बघा कसा पसरवते', तरुणीने VIDEOद्वारे दिली धमकी)

याच दरम्यान हा गेंडा रस्त्यावर फिरताना पाहायला मिळाला. चितवन राष्ट्रीय उद्यानातून हा गेंडा रस्त्यावर आला असावा. हा व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे हा गेंडा फक्त फिरत नाही आहे, तर रस्त्यावर आलेल्या एका माणसाचा त्याने पाठलाग केला आहे. हा माणूस शिताफीने पळून जातो आणि मग हा गेंडा पुढे निघून जातो.

व्हिडीओ शेअर करताना प्रवीण कसवान यांनी लिहिले की, ''बहुकेत या गेंड्याने गोष्टी आपल्या हातात घेण्याचा विचार केला आणि तो तपासणी करत आहे. दरम्यान गेंडे लॉकडाऊन नसतानाही जंगलातून बाहेर पडतात.''  क्रिकेटर केव्हिन पीटरसन यांनी देखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे. त्यांनी 'Save our Rhino in Africa and India' या चॅरिटीची स्थापना केली आहे.

दरम्यान हा व्हिडीओवर आणखीही काही मजेशीर कमेंट्स आल्या आहेत

हा व्हिडीओ आतापर्यंत एक लाख लोकांनी पाहिला आहे. तर हजारोंच्या संख्येने लाइक्स आणि रिट्वीट या व्हिडीओला मिळत आहेत.

संपादन-जान्हवी भाटकर

First published: April 8, 2020, 7:49 AM IST

ताज्या बातम्या